नागपुरात ‘हिटमँन’चा जलवा; टीम इंडियाची आस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात

नागपुरात ‘हिटमँन’चा जलवा; टीम इंडियाची आस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राहुल पाटील

नागपूर: नागपुरात आज जामठा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर झालेल्या भारत आस्ट्रेलिया दरम्यान सामन्यात भारताने ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन T20 सामन्यांची मालिका खेळत आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा टी-20 सामना नागपूरच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

नागपुरात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात संघानं दोन गडी गमावले. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट अक्षर पटेलच्या षटकात गेल्या. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीनं कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर भरपाई करताना ग्रीन धावबाद झाला. ग्रीन चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलनं ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं. मॅक्सवेलला खातेही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियानं आठ षटकात नव्वद धावा करून भारताला 91 धावांचं टार्गेट दिलं होतं.

वेड 20 चेंडूत 43 धावा करत नाबाद
जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात कर्णधार फिंचला क्लीन बोल्ड केलं. फिंचला 15 चेंडूत 31 धावा करता आल्या. चार गडी बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडनं स्टीव्ह स्मिथसोबत पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्मिथ धावबाद झाला. वेड 20 चेंडूत 43 धावा करून नाबाद राहिला.

*हायलाईट्स*

वेडनं चार चौकार आणि तीन षटकार मारले.
स्मिथ पाच चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
भारताकडून अक्षर पटलेवनं दोन षटकांत तेरा धावा देत दोन गडी बाद केले.
बुमराहने दोन षटकांत 23 धावा देत एक विकेट घेतली.
हार्दिक पांड्याने एका षटकात 10 धावा आणि युझवेंद्र चहलने एका षटकात 12 धावा दिल्या.
हर्षल पटेल सर्वात महागडा ठरला. त्याने दोन षटकात 32 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
अक्षरची हॅटट्रिक हुकली
चौथ्या षटकात अक्षर पटेल पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला

ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अक्षरनं टीम डेव्हिडला क्लीन बोल्ड केलं. डेव्हिडला तीन चेंडूत दोन धावा करता आल्या. मात्र, अक्षरची हॅटट्रिक हुकली. त्यानं सलग दोन चेंडूंवर मॅक्सवेल आणि डेव्हिडला बाद केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles