Home गावगप्पा देवदेवतांच्या तसबिरी व मूर्तींचे संकलन

देवदेवतांच्या तसबिरी व मूर्तींचे संकलन

61

देवदेवतांच्या तसबिरी व मूर्तींचे संकलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन_

अमृता खाकुर्डीकर

पुणे-(प्रतिनिधी)- आपल्या घरातील किंवा कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरी कालांतराने खराब होतात. देवाच्या मूर्ती जुन्या होऊन भग्न होतात, त्याचप्रमाणे देवघरातील जुने देवांचे टाक, पुतळे, जुन्या जीर्ण पोथ्या, धार्मिक ग्रंथ, पूर्वजांच्या तसबिरी इत्यादी वस्तू वापरणे शक्य नसल्याने त्यांचे नेमके काय करायचे असा प्रश्न पडतो. वाहत्या पाण्यात अशा वस्तू प्रवाहीत करणे धर्मसंकेतानुसार मान्य असले तरी त्यांच्याशी जोडलेल्या आपल्या भावना ध्यानात घेता असे करणे मनाला पटत नाही.

परंतु…आता या प्रश्नाला पर्याय म्हणून एक अत्यंत उपयुक्त उपक्रम नाशिक येथील *संपूर्णम्* संस्थेच्या सहकार्याने पुण्यात राबवण्यात येत आहे. विशेषतः दिवाळीआधी घराची साफसफाई व रंगरंगोटी करताना या जुन्या वस्तूंचा प्रश्न जास्त भेडसावतो. म्हणून खास लोकांची सोय लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी आपल्या घरातील या श्रध्देय वस्तूंचे संकलन ही संस्था करणार आहे. या वस्तूंचा पुनर्वापर अथवा विघटन ही प्रक्रिया कुणाच्याही भक्तीभावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेऊन अगदी व्यवस्थित रित्या केले जाईल. ही संकलन मोहीम रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सहकार सदन भारती निवास सोसायटीचा हॉल,इन्कमटॅक्स लेन, प्रभात रोड ची १४ वी गल्ली, एरंडवणा, पुणे-4 येथे
राबविण्यात येणार आहे. ईच्छुकांनी येथे संपर्क करावा.

या पवित्र कार्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता या ईच्छा असल्यास देणगी संकलनस्थळी स्वीकारली जाईल. या मोहीमेस यापूर्वी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यंदाही लोकांनी जास्तीतजास्त सहभागी व्हावे, असे आवाहन मोहीम संयोजक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी केले आहे.