तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, रोजगार मेळाव्याचे आयोजन

तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, रोजगार मेळाव्याचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर

पुणे-(प्रतिनिधी)- पुणे आणि सोलापूर येथील एकूण 450 ता॔त्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वी ठरलेल्या रोजगार मेळाव्याचे आयोजन कोहीनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूटच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. संस्थेच्या डेक्कन येथील शाखेत सदर मेळावा भरवण्यात आला. पुणे व परिसरातील विविध उद्योजक कंपन्यांचे 20 प्रतिनिधी या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून आवर्जुन सहभागीत झाले होते.

“पोषाख” या पुण्यातील प्रसिध्द ब्युटीकच्या संचालक आणि फॅशन डिझाईन क्षेत्रातील नामवंत सुश्री कविता अवस्थी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे शैक्षणिक व आस्थापना प्रमुख श्री. अभिजित खाचणे, रोजगार व्यवस्थापन प्रमुख श्री. गणेश राघवन आणि व्यवस्थापिका सारिका मुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशिक्षित मनुष्यबळाची खाजगी कंपनी सेवा क्षेत्रात नेहमीच गरज असते, तसेच तांत्रिक अभ्यासक्रम प्रत्यक्ष अनुभवासह पूर्ण केलेल्या प्रशिक्षित तरूणांना रोजगाराची गरज असते, हे लक्षात घेऊन “केटीआय’ म्हणजेच ‘कोहीनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट’च्या पुणे येथील डेक्कनवर स्थित असलेल्या केंद्राच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे खास आयोजन केल्याची माहिती व्यवस्थापिका श्रीमती सारिका मुळे यांनी यावेळी बोलताना दिली.

संस्थेने गेली अनेक वर्ष हजारो ता॔त्रिक प्रशिक्षित विद्यार्थी घडवले असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह प्रत्यक्ष अनुभव देऊन आणि विविध कंपन्यांशी संपर्क साधून नोकरी मिळवून देण्याची हमी देणे हे कोहीनूर टेक्नीकल इन्सिस्टिट्यूटचे वैशिष्टय आहे. रोजगार मेळावा आयोजित करून चांगल्या कंपन्यांमध्ये आम्हाला नोकरीसाठी मुलाखतीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागी तरूणांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles