जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, टीम इंडीयाला मोठा धक्का

जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, टीम इंडीयाला मोठा धक्का



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला आहे. त्यात आता आणखी एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान, बीसीसीआयनं जसप्रीत बुमराहबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्याचं वृत्त दिलं आहे.

*जसप्रीत बुमराहची दुखापत चिंता वाढवणारी*
भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आधीच गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळं संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावं लागलंय. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयमधील सुत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्याची शक्यता नाही. बुमराहच्या दुखापतीनं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आधी रवींद्र जाडेजा त्यानंतर आता जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles