मराठी चित्रपट ‘प्रेम लागी जीवा’ VIFFA पुरस्काराने सन्मानित

मराठी चित्रपट ‘प्रेम लागी जीवा’ VIFFA पुरस्काराने सन्मानितपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘कस्तुरी फिल्म’च्या पहिल्याच चित्रपटास दोन पुरस्कार

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दि २३ ते २५ सप्टेंबर अशा तीन दिवस चाललेल्या ‘विदर्भ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा समारोप आज हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या, धरमपेठ येथील साई सभागृहात वैदर्भीय कलावंताच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. नागपूरच्या प्रसिद्ध निर्माती, लेखिका, कथाकार, गीतकार कवयित्री व अभिनेत्री प्राजक्ता खांडेकर यांच्या ‘कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड’ तर्फे निर्मित ‘प्रेम लागी जीवा’ या पहिल्याच चित्रपटास ‘सामाजिक संदेश’ या गटातील ‘उत्कृष्ट चित्रपट निर्मिती’चा व उत्कृष्ट कथा /गीतकार अशा दोन पुरस्काराने प्रेम लागी जीवा चित्रपटास सन्मानित करण्यात आले.

सलग तीन दिवस चाललेल्या या चित्रपट महोत्सवात मुंबई, पुणे, कोकण, दिल्ली, गुजरात येथील चित्रपट निर्माता, दिग्दर्शक कलावंतानी हजेरी लावली होती. हा चित्रपट महोत्सव ‘भारतीय सिनेयुग निर्मिती व अकादमी, मुंबई’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष चित्रपट लेखक अनिल शिंपी, स्पर्धेचे परीक्षक अभिनेते विवेक अलोणी, चित्रपट समीक्षक, लेखिका माधुरी अशिरगडे, रसराज सर मुंबई यांच्या हस्ते कस्तुरी फिल्मच्या निर्माती प्राजक्ता खांडेकर व मिडीया पार्टनर राहुल पाटील, अध्यक्ष, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी रतन खांडेकर, दिव्यता रंगराज लांजेवार, कु कस्तुरी खांडेकर आदी उपस्थित होते.

कस्तुरी फिल्म निर्मित ‘प्रेम लागी जीवा ‘हा मराठी चित्रपट २२ एप्रिल शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला व चित्रपटास उत्कृष्ट प्रतिसादही संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला. निर्माती प्राजक्ता खांडेकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला चित्रपट वितरक (डिस्ट्रीब्यूटर) म्हणून सुद्धा पुढे कार्य करणार आहेत. ही महिला कलावंतासाठी तसेच वैदर्भीय रंगकर्मींसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ‘प्रेम लागी जीवा’ हा चित्रपट निर्मिती झाल्यानंतर, चित्रपट प्रदर्शित करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला व प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नवीन निर्मात्याला त्रास होऊ नये व त्यांना राज्यातील योग्य ते चित्रपटगृह माफक दरात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. तेव्हा आता त्या चित्रपट निर्मिती बरोबर चित्रपट रिलीजिंगचे काम करणार आहेत. कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड ही कंपनी मुख्यतः नागपूरची असून, प्रसिद्ध कवयित्री व गीतकार प्राजक्ता खांडेकर यांची आहे. प्राजक्ता या नागपूरचे स्मृतीशेष सुप्रसिद्ध गीतकार रंगराज लांजेवार यांच्या प्रथम सुकन्या आहेत.

‘प्रेम लागी जीवा’ हा चित्रपट पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रदर्शीत करण्याचा प्राजक्ता खांडेकर यांचा मानस आहे. या चित्रपटातील कलाकार सोमनाथ लोहार, वैशाली साबळे, प्राजक्ता खांडेकर, रवींद्र ढगे, नागेश थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव, हर्षद पठाडे, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे,माधुरी वरारकर, श्री खराडे, रविराज सागर, साक्षी सावंत,दीपाली लोहार, आकाश दळवी, विष्णू उपाद्ये, राजेंद्र कांबळे, अनिल सुरवसे,अक्षय वाघमारे, ज्योती पाटील, बाल कलाकार सौंदर्या स्वामी असून कथा /पटकथा /संवाद :प्राजक्ता खांडेकर, संगीत: जब्बार धंनजय, गीतकार :प्राजक्ता खांडेकर, गायक :सुप्रिया सरोदे, विनायक बोकेफोडे, मेघाम्बरी, छायाचित्रण :धनराज वाघ, ड्रोन ऑपरेटर :अक्षय गोडीवाले, संकलक :अनिल वाघमारे, कला दिग्दर्शक :सोमनाथ लोहार, असोसिऐट दिग्दर्शक :हर्षद पठाडे यांनी आपली जबाबदारी उत्तमोत्तम पार पाडली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles