
लातूर आयोजन समितीच्या वतीने संस्थापकाचा सत्कार
प्रा.कल्याण राऊत प्रतिनिधी
लातूर: मराठीचे शिलेदार बहुद्देशिय संस्था,नागपूर व संमेलन आयोजक समिती लातूर यांचे वतीने एक दिवशीय कवीसंमेलन व पुरस्कार वितरण दिवाळीअंकाचे प्रकाशन करण्यात आले.
सविस्तर वृत असे की,लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे साहित्यगंध दिपोत्सव अंक प्रकाशना निमित्ताने भव्य आदर्श शिक्षक पुरस्कार,साहित्यगंध पुरसकार आणि जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. संमेलन आयोजक टिम लातूर सर्वश्री संग्राम कुमठेकर,प्रा.कल्याण राऊत, प्रा.शंकर वाघमारे, शिवाजी नामपल्ले, बालाजी सगट, शांतीनाथ कोटे,दिपरत्न निलंगेकर, प्रा.सुरेश जोंधळे, अनिल खंडागळे,आण्णाराव नरसिंगे, दिनेश निलेंगेकर सर्व रा. लातूर यांनी संमेलनात
मा.राहुल पाटील यांना शाल व श्रीफळ व आयोजकांच्या वतीने छोटीसी भेट देऊन त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यात आले. प्रसंगीप्रमुख अतिथी डाँ. माजी खासदार सुनिल गायकवा,प्रमुख मार्गदर्शक डाँ.प्रा.माधव गादेकर ,प्रमुख अध्यक्षा सविताताई ठाकरे, उपस्थित होते.
दादांनी या मराठीचे शिलेदार बहुद्देशिय संस्था,नागपूर. संस्थेचे अध्यक्ष या नात्याने परवानगी दिली. सर्व कार्यक्रमाची सांगता शांततेने पार पडली. संग्राम कुमठेकरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपविण्यात आला.