
लातुरात रंगला साहित्यगंध पुरस्काराचा सोहळा
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शैक्षणिक जीवनगौरव पुरस्कार,साहित्यगंध पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी विद्यानगरी, लातूर येथे आयोजन केले गेले.
या कार्यक्रमाला मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती सविता ठाकरे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड,सिलवासा तर आ. संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री, डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार लातूर,डॉ. माधवराव गादेकर, माजी प्राचार्य शाहू कॉलेज लातूर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मा.राहुल पाटील हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामधून नाविन्यपूर्ण शैक्षणिक चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मी माझ्या संकल्पनेतून राबविलेल्या व ‘यशदा’ पुणे सारख्या राज्य शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेने दखल घेतलेल्या ‘शिक्षक पालक समन्वय अभियान’ या उपक्रमाचे सादरीकरण केले असता तेथील उपस्थित सर्व मान्यवर भारावून गेले. या कार्यक्रमाच्या उपस्थितीमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक राबवीत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती झाली व बऱ्याच मान्यवरांची ओळख झाली.