“सावित्रीमाई तू ज्योत क्रांतीची”; अनिता व्यवहारे

“सावित्रीमाई तू ज्योत क्रांतीची”; अनिता व्यवहारे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शिक्षणक्षेत्रात तुझाच लख्ख प्रकाश
स्त्री शिक्षण केलेस तू सुरु
सुखकर मग झाला जीवन प्रवास..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणे आजच्या काळात अशक्य.
तेव्हा त्या होत्या म्हणून आज आपण आहोत..
म्हणूनच त्यांच्या पावन स्मृतीला प्रथमता विनम्र अभिवादन!

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील कार्य असामान्य असाधारण आणि अद्वितीय असेच होते…. शिक्षणापासून स्त्रियांना ज्या काळात वंचित ठेवले त्या काळात पुण्यात सर्वप्रथम मुलींची शाळा काढणे सोपे नव्हते. पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हे काम अतिशय धैर्याने केले..
काल आज आपण साक्षरता अभियान राबवतो पण खर्‍या अर्थाने 1854 साक्षरता अभियानाची सुरुवात करणारे हे जोडपे वंदनीय आहे. सावित्रीबाई फुले अत्यंत खुल्या मनाच्या होत्या.. जात-पात अस्पृश्यता या गोष्टी त्यांच्या मनाला कधी ही शिवल्या नाहीत. त्यामुळेच स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद त्या काळात अस्पृश्यांना खुला करून देण्याची हिंमत त्यांच्यात होती..
त्यावेळच्या कर्मठ समाजाकडून
फसविल्या गेलेल्या विधवा किंवा परित्यक्त्या स्त्रीला आधार देताना ,
बाई ग तुझा काही दोष नाही… तुझे बाळंतपण मी माझ्या घरी आईच्या मायेने करील
.असं सांगण्याचे धैर्य आणि औदार्य या दोन्ही दोन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ होत्या त्या सावित्रीबाई म्हणूनच जगती महान ठरल्या. हुंडा घेऊन वधूपित्याला त्रास देणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात राग होता अगदी कमी खर्चातील लग्न सत्यशोधक समाजातर्फे लावण्याचे एक अतिशय उत्तम कार्य त्यांनी केले. स्त्रीला माणूस म्हणून जगण्यास सिद्ध करणार्‍या सावित्रीबाईंना त्या काळात किती विरोध सहन करावा लागला याची कल्पना येणे ही कठीण आहे..
पण ज्यांनी स्त्रियांच्या, मुलींचा उद्धारासाठी वसा जीवनभर घेतला होता आणि लोक जागराचा यज्ञ आयुष्यावर मांडला होता. त्यांनाही या विरोधाची काय तमा…
त्यांच्या आयुष्यातील एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे..
ज्योतिबा फुले बाहेरच्या खोलीत कार्यकर्त्यां समोर समवेत बसले होते. सावित्रीबाई तेथे आले आणि म्हणाल्या.
मला तिसरी लुगडे घ्याव म्हणते..
ज्योतिबांना मोठा आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आपली पत्नी असून सावित्रीबाई तिसरं लुगडं मागते..? आपले विचार तिला ठाऊक का नाही?
ते म्हणाले, ” आपणाला गरजेपुरतं अन्न आणि वस्त्र वापरावे. एक वस्त्र अंगावर नि एक धुवायला… दोन लुगडी असताना…..
पण कारभारी मध्ये पडले त्यांना राहवलं नाही…. ते म्हणाले, ज्योतिराव वहिनीसाहेब मुलींच्या शाळेत शिकवायला जातात. तेव्हा रस्त्याने जाताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकतात.
शाळेत शिकवताना स्वच्छ वस्त्र अंगावर नको काय? ज्योतिराव नि शब्द झाले.. आपल्या प्रिय पत्नीने आपल्याला होणाऱ्या त्रासाची तसूभरही कल्पना देऊ नये. सारे धाडसाने आणि अबोल पणे सहन करावे. मुलींना शिकवण्याचा घेतला वसा टाकू नये.
अभिमान आणि करुणा यांनी जोतीरावांच्या हृदयाचा ताबा घेतला..
ते बाहेर पडले ते तिसरे लुगडं घ्यायलाच…
मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भिडे वाड्यात मुलींची शाळा काढणारी ही क्रांतीज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोदगार आहेत. त्यांचा विसर कधी ही पडू नये..

दाही दिशा मधे उजळून निघावे असे तुझे कर्तृत्व
ज्ञानदानाच्या कार्यात तू घेतलेस नेतृत्व
शिक्षणाचा वसा देऊन आम्हास केले जागृत तुझ्यावर तो सदैव तुझ्या चरणी आम्ही राहू नतमस्तक
असे सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल म्हणावेसे वाटते….
आज कालच्या मुलींनी हेच लक्षात ठेवावं, खूप शिकाव सामर्थ्यशाली, भाग्यशाली व्हावं पण साधेपणा कधी ही सोडू नये.
सावित्रीचा जन्म व प्रत्येक हृदयात होणे हाच स्त्रीचा भाग्योदय आहे….

तुम्ही लावियले रोप शिक्षणाचे
त्याचा वेलू भिडे आभाळाला थेट
तुझ्या प्रयत्नांनी शिकू लागल्या मुली मोप सामर्थ्याची दिली तूच तयांना मोठी भेट…

अनंत यातनांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य दाखविणाऱ्या या असामान्य विवेकी व्यक्तिमत्वाला शिक्षणाच्या चालतं बोलतं विद्यापिठ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी विनम्र अभिवादन…!

सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles