
दीक्षाभूमीवर रमाईचा पुतळा उभारणार -विलास गजघाटे
नागपूर : महिला मंडळ आणि आंबेडकरी जनतेच्या मागणीवरून दीक्षाभूमीवर आई रमाईचा पुतळा उभारण्यात येईल असे आश्वासन दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी दि १२ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार भवन येथे आयोजित जिजाऊ जयंती कार्यक्रमात केले.
पत्रकार भवन येथे सभागृहात आज राजमाता माँ जिजाऊ, आई सावित्री फुले व फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्रबुद्ध महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कमलाबाई भगत उपस्थित होत्या.
यावेळी प्रा. रंजनाताई सुरजुसे, एडवोकेट स्मिता ताकसांडे, संध्याताई बोरकर, शिलाताई तेलंग, तरलाताई कांबळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक मीनाताई मून यांनी केले व आभार चंद्रकलाताई दुपारे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रदीप मून यांनी केले. यावेळी बोलताना विलास गजघाटे म्हणाले की, माता जिजाऊ, रमाई व फातिमा शेख या महिलांच्या प्रेरणास्थान आहे. रमाईचा पुतळा नागपुरात कुठेही नसल्यामुळे हा पुतळा दीक्षाभूमीवर व्हावा असा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. त्यापुढे बहुजन समाजाच्या महिलांनी बुद्ध धम्माच्या प्रवाहात आले तरच त्याची प्रगती होत असल्याचे मत प्रभाकर दुपारे यांनी केले. कार्यक्रमाला चित्रकार सुरेश मून, गौरीशंकर सावनकर, मीनाताई खैरकर व संघमित्रा पाटील आणि गजानन पाटील आदी उपस्थित होते.