
अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कोषाध्यक्षपदी प्रा.कल्याण राऊत
लातूर: अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे या संस्थेची नुतन शाखा लातूर येथे नुकतीच उघडण्यात आली असून त्या निमित्त झालेल्या बैठकी मध्ये अनुमोदक प्रकाश घादगिने आणि समन्वय समतीचे अध्यक्ष भारत सातपुते (प्रसिध्द कवी) सर्वानुमते रमेश चिल्ले अध्यक्ष, कलवले सर कार्यवाहक, प्रा.कल्याण राऊत कोषाध्यक्ष, प्रा.रामकृष्ण समुखराव व सौ.वृषाली पाटील उपाध्यक्ष, सौ.नयन राजमाने ह्या सहकार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
येत्या २४ जानेवारी २०२३ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,प्रकाश नगर, लातूर येथे पहिले बालकुमार साहित्यसंमेलन घेण्याचे आयोजित बैठकीत ठरविण्यात आले आहे.