
झिंगानूर येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
_माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन_
_माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थिती_
सिरोंचा :तालुक्यातील अतिदुर्गम, संवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने गोंडवाना क्रिकेट क्लब यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. दिपक आत्राम यांच्या हस्ते थाटात पार पडले.स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून झिंगानूर ग्रापं सरपंचा निलीमा मडावी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती. यासोबतच आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, प्रभारी अधिकारी देविदास झुंगे,पाटील,सत्यम नीलम,आलापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके, गोंडवाना क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दासू मडावी,उपसरपंच शेखर गणारपू, माजी उपसरपंच शंकर मडावी,ग्राम पंचायत व्येंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे, सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे,मादारामचे सरपंच दिवाकर कोरेत,कोरलाचे सरपंच गणपती वेलादी,कोप्पेलाचे सरपंच सुरेश जनगाम,वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे, मुख्याध्यापक पिरे, केंद्र प्रमुख दुर्गम,अविस चे चिंतामाण कुळमेथे,दुर्गेश लंबाडी,रामचंद्र कुम्मरी,आदींची उपस्थिती होती.
सदर आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रथम, द्वितीय तसेच तृतीय स्थान पटकाविणा-या संघाना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत विविध प्रोत्साहनपर बक्षिसांची रेलचेल आहे. या स्पर्धेत अतिदुर्गम भागातील अनेक गावातील क्रिकेट संघानी सहभाग नोंदविला असून क्रिकेट शौकिनांना या स्पर्धेतील थरार अनुभवता येणार असून झिंगानूर परिसरातील अविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.