गुजगोष्टी

गुजगोष्टी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रीत जुळली तुझी माझी
गुजगोष्टीही सुरू झाल्या
हृदयीच्या छेडता तारा
एकमेका कळू लागल्या

अंतरीच्या भावनांना प्रिये
वाटा मोकळ्या झाल्या
मनसोक्त बोलण्याने तुझ्या
भावना प्रकट होत गेल्या

वाटे तुझ्याझी बोलतांना
क्षणभर थांबू नये बोलणे
किमया तुझ्या सहवासाची
आभाळ मज भासे ठेंगणे

निस्वार्थी प्रेम तुझे प्रिये
सदासर्वकाळ लाभत राहो
दिनप्रतिदिन गुजगोष्टीचा
गोडवा असा वाढत जावो

गुजगोष्टी करतांना तुजशी
मन माझे प्रफुल्लित होते
अंतःकरणातील भाव सारे
आपसूकच ओठावर येते

अंतराने दूर असली जरी
समीप असल्याचं जाणवतं
गुजगोष्टी होतातच अशा
नातं आणखीच दृढ होतं

बी एस गायकवाड
पालम, परभणी
=======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles