कवयित्री वनिता लिचडे यांच्या ‘बकुळगंध-एक प्रवास’ काव्य संग्रहाचे प्रकाशन

कवयित्री वनिता लिचडे यांच्या ‘बकुळगंध-एक प्रवास’ काव्य संग्रहाचे प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने यंदा वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ ‘भेट मराठी मनाची’ हा राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रकाशन समारंभात पवनी जि.भंडारा येथील प्रसिद्ध कवयित्री वनिता लिचडे यांच्या ‘बकुळगंध-एक प्रवास’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले.

‘भेट मराठी मनाची’ या कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी संमेलन, मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक प्रकाशन व मराठी भाषा गौरव दिन विशेषांक लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या 51 कवींनी आपल्या दर्जेदार रचनांचे सादरीकरण करून मराठीचा जागर घडवून आणला.

वनिता लिचडे यांच्या ‘बकुळगंध-एक प्रवास’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व उद्घाटक मा. प्रभाकर दहिकर, वन्यजीव मार्गदर्शक, सरंक्षक व समाजसेवक, प्रमुख मार्गदर्शक व अतिथी संपादक मा.सुधाकर भुरके, ज्येष्ठ कवी, नागपूर
प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता खांडेकर, सिनेतारका चित्रपट निर्माती, नागपूर, प्रदीप ढोबळे, व्याख्याते, कवी संमेलनाध्यक्ष: मा. डॉ. संजय पाचभाई, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. विजय शिर्के, छ. संभाजीनगर, प्रमुख पाहुणे: नागोराव कोम्पलवार, यवतमाळ प्रमुख पाहुणे: मा. द्रवेश जनबंधू, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. संतोष राऊत, गोंदिया, प्रमुख पाहुणे: संग्राम कुमठेकर, लातूर, प्रमुख पाहुणे: रंजना ब्राम्हणकर, गोंदिया व संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने वनिता लिचडे यांचा संपूर्ण कुटुंबासह शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन अध्यक्ष राहुल पाटील व पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles