‘लक्ष्मीचं विरजण’; संगीता पांढरे

‘लक्ष्मीचं विरजण’; संगीता पांढरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मागच्याच आठवड्यात आम्ही सगळ्या मैत्रिणीं दुपारच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे डबे खाण्यासाठी बसलो होतो. एका शिक्षिकेने दही आणले होते. दही छान घट्ट, दाट चवदार झाले होते. गप्पा मारता मारता विषय निघाला. एकजण म्हणाली, व्वा!काय छान दही लागलंय हो!!’ ‘हो हो..खूपच दाट ,गोड नि चवदार आहे.’.दुसरीने री ओढली. ‘माझं दही तर पातळच होतं.. तुम्ही गायीचं दूध वापरता की म्हशीचं’?..आणखी एकजण म्हणाली. मग आम्ही म्हणू लागलो ..,लक्ष्मी मॅडम सांगा तरी कशी काय जमलीय तुम्हाला ही टॅक्ट..?

त्यावर त्या म्हणाल्या,’अहो त्यात काय एवढं‌!!..एकदा लावलेलं विरजण मोडायचंच नाही’. “म्हणजे..??” एका दमात आम्ही बोललो!! अहो..आता जे तुम्ही दही खाताय ना..ते माझ्या आईनं मला माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदा माहेरी गेले होते तेंव्हा दिलेल्या विरजणाचंच आहे. ‘तरी अशी किती वर्ष झाली मॅडम लग्नाला..?’ आम्ही विचारु लागलो. ‘सत्तावीस वर्षे’..!! त्या म्हणाल्या.

आम्ही साऱ्याजणी एकदम अचंबीतच!! …. २ मिनिटे तरी निशब्दच.. सोबत चेहऱ्यावर आश्चर्याचे अचंबीत भाव.. कधी लक्ष्मीकडे कधी एकमेकींकडे पाहत अॉ..करून बघत राहिलो. अहो काय सांगताय काय मॅडम..सत्तावीस वर्षे..??? कुणी असं ठेवतं का विरजण इतके दिवस..? मी म्हणाले. अहो खरंच सांगतेय मी..खोटं नाही सांगत तुम्हाला.. माझ्या आईनं लग्न झाल्यावर ते विरजण मला दिले आणि सांगितले की,”बया..हे विरजण कधी मोडू देवू नगंस’ विरजण मोडलं की संसार मोडतू असं म्हणत्यात!! ” आणि तेव्हापासून आजतागायत मीही ते कधीच नाही मोडू दिलं!!

हे कसं शक्य आहे..आणि कधी गावाला..ट्रीपला आठ पंधरा दिवस गेल्यावर.? आम्ही विचारु लागलो. त्या म्हणाल्या,”एकतर पूर्वी मी दोनचार दिवसांपेक्षा जास्त दिवस कुठे बाहेर जात नव्हते आणि गेले तरी जवळच्या कुणाकडे देवून जायचे.आल्यावर परत घ्यायचे.आता कधी गेले तर फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवते.राहते ते चांगले.. ही कहाणी ऐकून आम्ही खरोखरच थक्क झालो. नंतर त्यांनी विरजण लावायला आम्हाला दही तर दिलेच पण दुसऱ्या दिवशी सुमधूर ताकाचा आस्वादही दिला.

एवढा नेकीने, लक्षपूर्वक, काळजीने इतक्या वर्षांपासून विरजण जपणारी आधुनिक काळातली ही स्त्री आम्ही पहिल्यांदाच पाहात होतो.असे विरजण जपणारी स्त्री संसार नीट न करेल तरच नवल!! एकत्र कुटुंबपद्धतीत दिवस काढत पै पै जुळवत आता त्यांनी शहरात जागा घेवून सुसज्ज ‘लक्ष्मी’ बंगला उभारलाय.. दोन्ही मुले डाॅक्टर, इंजिनिअर झाली आहेत.आणि लक्ष्मीचं विरजण खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं वरदानच ठरलं आहे.अस म्हणायला काहीच हरकत नाही. आजकाल एक दोन वर्षात मुलामुलींचे संसार मोडणाऱ्या या जमान्यात .. विरजणाची ही कथा सर्वांच्या मनात कोरली गेली ! मी तर सहजच त्यांना म्हणून गेले. मॅडम तुमचं नाव गिनीज बुकमध्येच जायला हवं! आणि तेवढ्यात टणटण घंटेच्या आवाजात आमचा हशा विरुन गेला.

सौ.संगीता सुरेश पांढरे
इंदापूर, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles