
सूर तेच छेडिता
सूर तेच छेडिता
शब्दभाव जागले
अनमोल प्रेमाचे
सौख्य मज लाभले ||१||
छेडता सुरांस या
गीत गुंजले मनी
साथ तुझ्या प्रितीची
असावी क्षणोक्षणी ||२||
अशी सापडे लय
जीवनात बहार
ऐकण्या सुमधुर
वाजते ही गिटार ||३||
सूर तेच छेडिता
मनी सौख्य जाहले
पाहता तुला सख्या
मनी मीच लाजले ||४||
मनात प्रेमभाव
सप्तसूर जागवी
सूर तेच छेडिता
आस मनी दाखवी||५||
कशी सांगू शब्दात
सप्त स्वरांचे भाव
अबोल या मनाचा
घ्यावा अचूक ठाव ||६||
विनायक कृष्णराव पाटील
बेळगाव, कर्नाटक