
मन मनात रुसले
ओळखून जख्म माझे
नेमके मीठ तू का चोळले
तुझ्या जरतारी वस्त्रांवर
मी नव्हते रे भाळले
भावरूप माझे तुला न कळले
शल्य अजूनही बोचते
भासमय प्रेमाच्या पुरात
का मी एकटीच वाहते ?
असंख्य काटे रुतुनी बसती
आठवणीच्या गुलाबात
लपवून अंतरीच्या वेदनांना
आज गुलाब हसतो आहे..
बिलगून काट्यालाही
मन मनात रुसले आहे
साद घालू नको पुन्हा
नकोच त्या वेदना
ना कळतील कधी तुला
माझ्या या संवेदना..
वळून पाहणे नको आता
नकोच तुझ्या शब्दखुणा
आयुष्याच्या झुल्यावरी
मी एकटेच झुलेन पुन्हा..
सीमा वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर
==========