
चूकभूल द्यावी घ्यावी
मी पाहिले अंधाराला
प्रकाश गिळून टाकतांना
बांधावरच्या बाभळीला
शेत गिळंकृत करतांना
टोकले नाही कधीच तया
ना बोलले रागात जेव्हा
हल्लोळ माजला चहूऔर
शब्दाला धार लावली जेव्हा
पेटून उठली अन्यायाविरुद्ध
रणशिंग फुंकले प्रथेविरूद्ध
सैरावैरा पळत सुटले श्वान
उगारली काठी कथेविरूद्ध
करण्या मग्रुराशी दोन हात
उतरावे लागले चिखलात
पंकातही फुलतात कमळे
सज्ज घेऊन लेखणी हातात
समरसते विरूद्ध लढ्यात
असतील पोळले अज्ञात काही
प्रार्थते चूकभूल द्यावी घ्यावी
मान्य चुकीला माफी नाही
सविता धमगाये, नागपूर
====