
मंडी
सुंदर सुंदर पऱ्या जनू
भुवरी अवतरल्या होत्या
कोवळ्या नाजूक बाहूल्या
साजूक तुपात नाहल्या होत्या…
दाराच्या उंबरठ्यावर बसून
देहाला स्वताच्या स्पर्शत
नको नको त्या इशाराने
गिऱ्हाईकास खुणावत
बाजार देहाचा मांडला
कोवळ्या कळ्या तोडण्या
लचके तोडतील बगळे
गुपचूप हजरी लावण्या
मंडी पाहता देहाची
शरीर थरथर कापत होते
थंडगार वातावरणात ही
घामाच्या धारेत भिजले होते
सुगंध दरवळला चहुकडे
गुलाबी ते शहर होते
नशेत निजलेले अंगण ते
पैशाच्या मंडीत हरवले होते
सारिका डी गेडाम, चंद्रपूर