न. प. उर्दू डिजिटल शाळेत पालक सभा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

न. प. उर्दू डिजिटल शाळेत पालक सभा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: स्थानिक न. प. जि.प. उर्दू उच्च प्राथमिक डिजिटल कन्या शाळा गडी वार्ड पुसद येथे पालक सभेचे तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पुसद श्री कार्तिकेयन एस. होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न. प. पुसद चे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड,उप मुख्याधिकारी सुरेश राठोड, प्रशासन अधिकारी अमोल मदने, शिक्षण तज्ञ मिर्झा जाकीर बेग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल सईद तसेच पालक अब्दुल हन्नान उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुरआनची तिलावताने झाली. नंतर शाळेचे मुख्याध्यापक महोम्मद मतीन यांनी शाळेचा शैक्षणिक आढावा सादर केला. मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी शाळेची पटसंख्या पाहून तसेच शाळेत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे उपक्रम पाहून मुख्याध्यापक मोहम्मद मतीन तसेच सर्व शिक्षकांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणेत सहाय्यक जिल्हा अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी पुसद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळा बद्दल समाधान व्यक्त केले. नंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद साजिद यांनी केले तर आभार अजहरुद्दीन खतीब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक खानम गजाला व मोहम्मद अश्फाक यांच्यासह फरहीन तबस्सूम, समीना सहेर, आणि शाहीद अहमद यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles