‘चांदण्यांची ओंजळ दाखवते आत्मकल्याणाची दिशा’; सविता पाटील ठाकरे

‘चांदण्यांची ओंजळ दाखवते आत्मकल्याणाची दिशा’; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

*अगदी चाकाच्या गतीप्रमाणे अनादी काळापासून निरंतर गतिमान असलेले अमर्यादित* *स्वरूपाचे निसर्गचक्र म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगतीचे द्योतक होय. आपण नेहमीच पाहतो की या वैभवशाली सृष्टीतील स्थुलतत्व असोत की सूक्ष्म तत्व दोन्ही माणसाला नेहमीच खुणावतात.* *गरज ही शोधाची जननी आहे या*
*उक्तीप्रमाणे.. मग माणूस संशोधनाच्या मदतीने ज्ञानाला आपलंसं करतो, अशा ज्ञानप्राप्ती बाबत अवकाश नेहमीच माणसाला साद घालते*.

*ब्रह्मांड….. माणसाला कधीही न उलगडणारे कोडे….खास करून सूर्य, चंद्र,आकाशगंगा,तारे,ग्रह नक्षत्र यात जरी कुणी लहान कुणी मोठे असले तरी सर्वांचे महत्त्व आहेच. दिवसाचा राजा सूर्य तर रात्री ऐश्वर्य असते चंद्राचे.. सूर्याची प्रखर तेजस्विता तर चंद्राची शितलता..एक सहस्रांशू तर दुसरा हिमांशू, एक ग्रीष्मात रुद्ररूप धारण करतो तर एक कोजागिरीला आपले तेज मुक्तपणे सर्वत्र उधळतो*.

*सर्वांचा आवडता चांदोमामा आणि त्याच्या आजूबाजूचा परिवार म्हणजे चांदण्या…पौर्णिमेला जणू त्यांच्या आनंदाला एवढे उधान येतं की साऱ्या विश्वाला त्या आपल्या ओंजळीने भरभरून देतात. चांदोमामा या चांदण्याची ओंजळ करून विश्वाला जणू सादच घालतो,अन् संदेश देतो की माझ्याकडून शिका काहीतरी… महिन्यातून* *एकच दिवस मी पूर्ण असतो पण मी २९ दिवसाचे दुःख न करता एक दिवसाचा आनंद साजरा करतो.आणि रीती करतो चांदण्याची ओंजळ.*
*तशा तर चांदण्या रोजच आकाशात असतात पण त्यांच्या सौंदर्याला झळाळी प्राप्त होते ती पौर्णिमेला.*
*पौर्णिमेच्या या सुंदर रात्रीचं निसर्गाशी फार जवळच नातं आहे म्हणून तर चैत्र* *पौर्णिमेला महालक्ष्मी, वणी येथे देवीचा उत्सव,वैशाखात बुद्ध पौर्णिमा ,ज्येष्ठातली पौर्णिमा स्त्रियांसाठी सौभाग्याचं लेणं घेऊन येते ती वटपौर्णिमा,आषाढात गुरुपौर्णिमा,श्रावणातली *नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन,भाद्रपदातली*
*प्रौष्ठपदी पौर्णिमा,अश्विनात कोजागिरी* *पौर्णिमा,कार्तिकात कार्तिकी पौर्णिमा, मार्गशीर्ष मध्ये दत्त जयंती,पौष मध्ये शाकंभरी पौर्णिमा, माघ पौर्णिमेला कुलदेवतेच्या आरत्या तर फाल्गुन मध्ये उपासनी पौर्णिमा..*

*साऱ्या विश्वाचा अंधकार दूर करणाऱ्या या पौर्णिमा म्हणजे विजयाचे प्रतीक….*
*सृष्टीत दाटलेले नभांचे ढग नाहीसे करत स्वतःला पूर्णत्व प्रदान करण्याची संधी मिळते ती पौर्णिमेमुळेच.* *अशी पोर्णिमा माणसाला नवजीवन देते,अंतर बाह्य जीवन* *निर्मळ,मनोरम,सुगंधित व रंजक बनवते.आज गरज* *आहे आपल्या अंतरंगातील पौर्णिमेला प्रकाशित करून*
*त्या चांदण्यांच्या प्रकाशात* *आपली पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय यांच्या मदतीने ज्ञान तेजाची पौर्णिमा ज्योतिर्मय करण्याची.*
*आज आपण पाहतो मानवामध्ये दडलेल्या वाईट प्रवृत्तीने अंधाराचे साम्राज्य दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. डोळे नेहमी नको ते पाहतात, उद्युक्त होतात, कान अभद्र श्रवण्यास तत्पर असतात.जीभ अभक्ष्य ग्रहण करायलाही मागेपुढे पाहत नाही. त्वचेलाही सुख स्पर्श हवा असतो.अवास्तव, विचार न करता बोलून आपण आपली वाणी खराब करतो. हाताने पापकृत्य सहज घडतात,नको त्या मार्गाकडे जाण्यासाठी पाय तत्पर असतात.*

*तेव्हा पौर्णिमा रुपी चांदण्यांच्या ओंजळीकडून आपण हेच शिकूया की चांगलं तेच मी करून* *आत्मकल्याणाच्या दिशेने वाटचाल करून मानवी जीवनाचे सार्थक घडविन.*

*खरंतर बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी समूहाचे सर्वेसर्वा मा.राहुल पाटील सरांनी ‘चांदण्याची ओंजळ’ हा बहुआयामी विषय दिला त्या विषयाला शब्दबध्द करणे तसे कठीण.कारण चांदण्यांच्या ओंजळीतून जीवनाच्या प्रत्येक घटकाला पाणी घालता येऊ शकते त्यासाठी हवी असते फक्त* *आपल्यातली कल्पकता….*
*काव्यपरिक्षणार्थ रचना* *वाचतानाही माझ्या लक्षात आलं की खरोखर पुष्कळ कवी कवयित्रींनी वेगळ्या* *तारा छेडून हा विषय छान रंगवला*

*काही कवितांमध्ये मी वाचले…*
*कुणी सखीपुढे गुपितांची ओंजळ रीती केली तर कुणी वचनांच्या ओंजळीत जीवन पाहिले..*

*कुणी नक्षत्रांची ओंजळ सजवली तर कुणाला तिच्या पत्रातील अक्षररुपी मोत्यांपुढे चांदण्याची ओंजळ रीती करावीशी वाटली.*
*कुणी प्रेमाच्या आणाभाकांसाठी चांदण्याची ओंजळ रिती केली तर कुणी सागरातल्या भरतीवर फिदा होऊन शब्द रचले..*
*खूप छान…तुम्हा सर्व शब्दप्रभूंचे खूप खूप अभिनंदन*
*लिहित रहा व्यक्त होत राहा आपल्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी मराठीचे शिलेदार समूह बांधील आहे या ग्वाहीसह थांबते…*

*मा.राहुल सरांनी मला पुनश्च लिहिण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हृदयस्थ आभार..*🙏🙏🙏

सौ सविता पाटील ठाकरे
मुख्य परीक्षक प्रशासक लेखिका कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles