
धुलिवंदन
नवचैतन्याची उजाडली पहाट
सोनेरी किरणांचा तेज
मनी ना मत्सर द्वेष
सांगे विसरा सारे भेद
वाईट व्यसनांचे करु दहन
अन्याय कुप्रथा अहंकार
अग्नीत जळो गर्व
मानवी तिरस्कार
आनंदी आकर्षक पर्व
विसरु भेदाभेद सर्व
सप्तरंगांची उधळण
रंगस्पर्शानं वाटे हर्ष
हरेक मुखी मधुर वाणी
अंतरी वसे स्नेहबंध
ममतेच्या रंगात न्हाऊनी
नित्य दरवळे सुगंध
इंद्रधनू सप्तरंगी
साजरा करू धुलिवंदन
मौजेनं उधळू मुक्त रंग
फुलवू प्रीतिचे नंदनवन
फैलवू समानता संदेश
वागू मायेनं एकसंगती
होळीभोवती जमती मेळा
मनोरंजन मैफिल रंगती.
संदीप मेश्राम, गोंदिया
मराठीचे शिलेदार समूह-सदस्य