वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यावर ३० हजार रुपये दाखवून शासनाची दिशाभूल

वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यावर ३० हजार रुपये दाखून शासनाची दिशाभूलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_न.प.च्या सहाय्यक शिक्षकाकडून मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी केला प्रताप_

तालुका प्रतिनिधी, पुसद

पुसद: शहरातील न.प.च्या मराठी कन्या शाळा क्र. दोनमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर रुजू असलेल्या शिक्षकाने मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी शासनाची दिशाभूल करण्याचा प्रताप केला आहे.

सहाय्यक शिक्षक पदावर काम करणाऱ्या शिक्षकाचा प्रति महिना मूळ पगार जवळपास ८६ हजार रुपये असून वर्षाकाठी दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळते. एवढे उत्पन्न मिळून देखील पुसदच्या तहसील कार्यालयामध्ये खोटी माहिती सादर करून मुलाला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ३० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखविल्याचा धक्कादायक प्रकार तक्रारी नंतर समोर आला आहे.

शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून तक्रारी सुरू आहेत.परंतु शासनच कानाडोळा करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.त्या सहाय्यक शिक्षकावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी २०२१ पासून वैभव मनोहर अंभोरे यांनी तक्रार केली आहे. त्या तक्रारीची पुसदचे शासन दखल घेऊन कारवाई करत नसल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार करून लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याच्या मागणी त्यांनी केली आहे.

गजानन भोपाजी अंभोरे असे नगरपरिषद मराठी कन्या शाळा क्रमांक दोन येथे सध्या नोकरीत असलेल्या सहाय्यक शिक्षकाचे नाव आहे. ते सन १९९३ मध्ये न.प. शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते.जवळपास ३० वर्षापासून श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहून न.प. च्या शाळेवर सहाय्यक शिक्षक पदावर नोकरी करत आहेत. त्यांच्या एका मुलाचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाची दिशाभूल करून उत्पन्नाचा दाखला मिळवून शिष्यवृत्ती हडप केली होती.तशाच पध्दतीने दुसरा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून वाशीम येथील एका नामांकित महाविद्यालयामध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेत आहे.

त्यांनी सन २०२०-२०२१ या करिता पुसदच्या तहसील कार्यालयामध्ये मुलाच्या शिक्षणाकरिता उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये शासनाची दिशाभूल करून पुरावे सादर करून वार्षिक तीस हजार रुपये उत्पन्न असल्याच्या दाखविले आहे.वास्तविक परिस्थितीमध्ये प्रशासकीय पदावर नोकरीवर असणाऱ्या सहाय्यक शिक्षकाला वर्षा पोटी दहा ते बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. त्यासोबतच दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे शेती असून शेतीतून देखील उत्पन्न मिळते. वर्षाला १५ ते २० लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या शिक्षकाला ३० हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून चौकशी न करता मिळतेच कसा असाच एक प्रश्न देखील तक्रारदारासह अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.त्या सहाय्यक शिक्षकावर कारवाई करण्यासाठी पुसद न.प.कार्यालय, तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालय व अमरावती यवतमाळच्या धर्मादाय आयुक्तालयाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे तरीही कोणीही दखल घेण्यास तयार नाही.

_सर्वात पहिली तक्रार नगरपालिकेला_

न.प.च्या मराठी कन्या शाळा क्रमांक दोनमध्ये सध्या नोकरीवर असलेले गजानन अंभोरे यांनी शासनाची दिशाभूल करून उत्पन्नाचा दाखला मिळविल्याची तक्रार वैभव अंभोरे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये केली होती.त्यानंतर पुसदच्या तहसील कार्यालयात २१ डिसेंबर २०२२ रोजी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद यांना दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी तर जिल्हाधिकारी कार्यालयात दि.२१ डिसेंबर २०२२ रोजी, यवतमाळ व अमरावती धर्मदाय आयुक्तकडे केली होती.

_शासकिय नोकरीत असून भरमसाठ कमाई_

शासकिय सेवेत न. प.शाळेत नोकरीवर असून मासिक ८६ हजार रुपये एवढा पगार मिळतो त्यात दहा टक्के पगार नगर पालिका देखील देते.तर दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे २० एकर शेती आहे.त्यासोबतच श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबार धामणगांव देव येथे मुख्यसचिव या पदावर असल्याचे व न.प. कर्मचारी पतसंस्था येथे सचिव असल्याचे संदर्भीय तक्रारीमध्ये वैभव अंभोरे यांनी नमूद केलेले आहे.

_सर्वात पहिले तहसीलदाराने कारवाई करायला पाहिजे_

नगरपालिकेचे सहाय्यक शिक्षक असलेले अंभोरे यांनी मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची शहानिशा करून त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक होते.तहसील कार्यालयाला तशी तक्रार दिल्याचे समजते.त्यामुळे तहसीलदार यांनी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई कराला पाहिजे.तहसिल कार्यालयाकडून तसा अहवाल आमच्यापर्यंत आल्यावर आम्ही सुद्धा कारवाई करू.-डॉ.किरण सुकलवाड मुख्याधिकारी,न.प.पुसद

_दोन-तीन दिवसात सेकंड रिमाइंडरचे उत्तर न मिळाल्यास न.प.ला कारवाईसाठी पत्र पाठवू_

नगरपालिकेचे सहाय्यक शिक्षक गजानन आंभोरे यांच्या संदर्भात तहसील कार्यालयाला तक्रार मिळालेली आहे.त्यांनी शासनाची दिशाभूल करून दोन्ही मुलाला शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी ३० हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळविला आहे.त्यांनी दिलेली माहिती शासनाची दिशाभूल करणारी आहे.त्यांनी पत्नीच्या घटस्फोटाचीही माहिती बॉंड पेपरवर दिलेली आहे.त्यांना कोर्टामार्फत घटस्फोट झाल्याबाबतचे कागदपत्र मागितले होते.पंधरा दिवसांपूर्वी सेकंड रिमाइंडरचे पत्र सुद्धा त्यांना पाठविले असून उत्तर मिळालेले नाही.त्यामुळे दोन-तीन दिवसात त्यांच्याकडून योग्य ते उत्तर न मिळाल्यास नगरपालिकेला कारवाई करण्यासाठी पत्र पाठवू.- एकनाथ काळबांडे,तहसीलदार पुसद.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles