आंबेडकरी तरुण हाच उद्याच्या भारताची आशा- दंगलकार नितीन चंदनशिवे

आंबेडकरी तरुण हाच उद्याच्या भारताची अशा- दंगलकार नितीन चंदनशिवेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद- सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 चा आज पाचव्या दिवशी प्रसिद्ध साहित्यीक आणि आंबेडकरी कवी नितीन चंदनशिवे यांच्या आंबेडकरी चळवळीत तरुणाची भूमिका या विषयावर व्याख्यान झाले तसेच प्रा. सय्यद सुलेमान यांनी महात्मा जोतिबा फुले आणि आजचा समाज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी ऍड. आप्पाराव मैंद होते.

*मी धर्माला थुका लावला*
*अन् माणूस झालो*
सध्या देशातील वातावरण प्रचंड संघर्षाचे आहे. धार्मिक आणि जातीय संघर्ष वाढला आहे. पण आपल्याला माणूस जपयाचा आहे. धर्म हा माणसासाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही. कोणताच ‘धर्म खतरेमे’ नसून पुढाऱ्यांचे राजकारण अडचणीत आहे.

*शील आणि सदाचाराल नितांत महत्व*
अंबेडकरी चळवळ ही तथागत भगवान बुध्दांच्या मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळें युवकांनी शील आणि सदाचाराची जोड आपल्या व्यक्तिमत्त्वास द्यावी. आंबेडकरी तरुण हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्म निरपेक्षता, शांततामय सहजीवन या सवैधानिक मूल्यांना घेवून काम करतो त्यामुळें अशा परिस्थितीत तोच एक आशेचा किरण आहे.

*मोबाईल वर भोंगा वाजो अथवा अजाण*
*ह्रुदयात मात्र राष्ट्रगीत वाजलं पाहिजे*

मोबाईल या संवाद साहित्यानं प्रचंड क्रांती केली आहे. प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल आहे. यावर असणारी पिढी ही आक्रमक आहे. त्यांच्याकडे संयम नाही आपल्या जातीच्या धर्माच्या अस्मिता फालतू आहेत आपण फक्त भारतीय असण्याचा अभिमान बाळगावा तीच आपली ओळख आहे. असे मत कवी नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी एका पेक्षा एक सरस अशा आपल्या रचना सादर केल्या.
परिवर्तन महिला मंडळ शिवाजी वार्ड आणि पारमिता महिला मंडळ महावीर नगर यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरवात झाली.

यावेळी विशेष अतिथी म्हणुन डॉ. मोहम्मद नदीम, प्रमूख पाहूणे म्हणुन प्रविण नचानकर ठाणेदार वसंत नगर पोलीस स्टेशन, सुधीर गोटे, नानासाहेब भवरे, यशवंत देशमुख, ललित सेता, गजानन जाधव, डॉ. गोपाळ शेलकिकर, साहेबराव धबाले, विष्णू गवळी, प्रभाकर ठाकरे आदी मंडळी उपस्थीत होती. कार्यक्रमांचे निवेदन बाळासाहेब कांबळे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कांबळे नत्तुजी वाहुळे नारायण ठोके, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, अंबादास वानखेडे, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना. हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे,रंगराव बनसोड आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles