शब्द अपुरे पडती

शब्द अपुरे पडती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शब्दात वर्णावी म्हणतो
जेव्हा मायबापाची महती
तेव्हा त्यांची थोरवी सांगण्या
शब्द अपुरे पडती

बहिणीची माया तर असते
कित्ती वेडी माया
स्वतः उन्हें झेलूनी
देते भावाला छाया
ही माया शब्दांत धराया
शब्द अपुरे पडती

भावाची माया पण असते
जगावेगळी माया
स्वतः उपाशी राहूनी
देई भावाला खाया
त्याच्या त्यागाची महती गाया
शब्द अपुरे पडती

आजी आजोबा अन्
आत्या मावशी
यांचे ही प्रेम निराळे
त्यांचे प्रेम शब्दात लिहाया
शब्द अपुरे पडती

नात्यांच्या या घट्ट विणीत
आपण विणले गेलो
या मायाजालात आपण
किती सुरक्षित आहोत
हे मायाजाल शब्दात विणाया
शब्द अपुरे पडती

डाॅ. नझीर शेख राहाता
जि. अहमदनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles