
शरद पवारांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा; राहुल गांधी
मुंबई- शरद पवारांच्या निर्णयावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि एम. के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडून शरद पवारांच्या राजीनाम्याचे कारण जाणून घेतले आहे. तसेच शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार विचार करावा, असे मत राहुल गांधी आणि एम.के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळेंकडे व्यक्त केले, अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली.
राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी मंगळवारी केली. यानंतर एकच खळबळ उडाली होती. शरद पवारांच्या निर्णयानंतर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भावुक झाले होते. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी राज्यभरातून राजीनामे दिले जात आहेत. तर, शरद पवारांनी 2024साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी कायम राहावे, अशी इच्छा राष्ट्रवादीशी विचार जुळणाऱ्या पक्षांतील नेत्यांची आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले.
केरळमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयानंतर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, असे बिगर भाजपच्या नेत्यांचे मत आहे. तसेच मीही या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती शरद पवारांना केली असल्याचे चाको यांनी सांगितले.