
माधुरी
मिनाकुमारी की मधुबाला
उपमा कुणाची द्यावी तिजला
वहिदा आशा साधना की हेमा
लावण्याची ती नवीच प्रतिमा
नृत्यशिल्प जणू जिवंत जाहले
ता थै तक दिल धकधक झाले
सौंदर्याला हिच्या नाही वय वर्ष
वदनी हिच्या सदा विलसतो हर्ष
कलागुणी गाननिपूण बुद्धीमती
जगी गाजतसे तिची दिगंत कीर्ती
सदैव एक स्मीत मोहक अधरी
मनमोहिनी ती मधु-मधूर माधुरी
अमृता अरूण खाकुर्डीकर