
इच्छा होती
मनात इच्छा होती
यावी मी तुमच्यापर्यंत
अडकून बसली अशी
या श्रीमंतांच्या तिजोरीत
खुप प्रयत्न केलाय
तिजोरीतून निघण्याचा
कुलूप बंद होता त्या
महलातील तिजोरीचा
पहारेकरी ठेवला
सुरक्षेसाठीच माझ्या
दम घुटमळत होता
तिजोरीतील काळोखात
जेव्हा रखडली होती
या देशाची अर्थव्यवस्था
पर्याय नव्हता म्हणून
माझ्या विचाराची आस्था
माझेही स्वप्न होते
चलनात स्थान मिळाले
ते पुर्णही झाले अन्
अल्पावधीतच बाद केले
मजला डांबून ठेवले
ना ठावूक का कुणास
राहिले स्वप्नं माझे
भेटू दिले ना तुम्हास..!
चंदू डोंगरवार अर्जुनी मोर