
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: १३ जून २०२३: मंगळवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विनायक पांडुरंग करमरकर – (२ ऑक्टोबर १८९१ –
१३ जून १९६७) विनायक पांडुरंग करमरकर /
नानासाहेब करमरकर, हे प्रसिद्ध शिल्पकार होते.
मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला
शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना १९६२ साली ‘पद्मश्री
पुरस्कार’ देऊन गौरवले.
==========
*ठळक घटना/घडामोडी*
१३ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
• १५२५: कॅथोलिक धर्मगुरू व नननी घेतलेले ब्रह्मचर्याचे व्रत मोडून मार्टिन ल्युथर व कॅथेरिना फॉन बोराने लग्न केले.
• १७७७: अमेरिकन क्रांती – अमेरिकेच्या सैन्याला तालीम देण्यासाठी मार्किस दि लाफियेत दक्षिण कॅरोलिनामध्ये आला.
• १८७१: कॅनडाच्या लाब्राडोर प्रांतात हरिकेन. ३०० ठार.
• १८८१ : यु. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
• १८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
• १८९८ : युकॉन प्रांताची रचना.
• १९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीच्या गॉथा जी विमानांची लंडनवर बॉम्बफेक. ४६ बालकांसह
१६२ ठार, ४३२ जखमी.
• १९३४ : व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट. यानंतर मुसोलिनीने हिटलरचे वर्णन छोटेसे बावळट माकड असे केले.
• १९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने युद्ध माहिती खाते सुरू केले.
• १९५२: सोवियेत संघाच्या मिग- १५ विमानाने स्वीडनचे डी.सी. ३ प्रकारचे प्रवासी विमान पाडले.
• १९५६: पहिली युरोपियन चैंपियन्स कप स्पर्धा रेआल माद्रिदने जिंकली.
० १९६६: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मिरांडा वि. अॅरिझोना खटल्यात निकाल दिला की पोलिसांनी संशयिताला पकडताना त्याच्या हक्कांची जाणीव करून दिलीच पाहिजे.
• १९७८: इस्रायेलची लेबेनॉनमधून माघार.
० १९८२ : सौदी अरेबियाचे राजे खालिद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ फहद राजेपदी.
० १९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
=========
*वाढदिवस / जयंती*
१३ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
• १८३१ : जेम्स क्लार्क मॅक्सवेल (ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ, मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९).
० १८७९: गणेश दामोदर / बाबाराव सावरकर (भारतीय स्वातंत्र्यसैनिक. मराठी व्यक्ती, मृत्यू: १६ मार्च १९४५).
• १९०५ : कुमार श्री दुलीपसिंहजी ( इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते, मृत्यू: ५ डिसेंबर १९५९).
• १९०९: इ. एम. एस. नंबुद्रीपाद (केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, मृत्यू: १९ मार्च १९९८).
• १९२३: प्रेम धवन (गीतकार, पद्मश्री पुरस्कर्ते, मृत्यू: ७ मे २००१).
• १९६५: मनिंदर सिंग (भारतीय क्रिकेटपटू).
==============
*मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन*
१३ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
• १९६७: विनायक पांडुरंग करमरकर (भारतीय शिल्पकार, जन्म: २ ऑक्टोबर १८९१).
• १९६९: केशव कुमार / प्रल्हाद केशव अत्रे (कॉमेडियन, नाटककार, कवी, पत्रकार, अध्यापनकार, समीक्षक, प्रभावशाली वक्ते, राजकारणी, जन्म: १३ ऑगस्ट १८९८).
• २०१२ : मेहंदी हसन (पाकिस्तानी गझल गायक, मेहंदी हसन यांची प्रसिद्ध गझल गीते, जन्म: १८ जुलै १९२७).
० २०२०: वसंत नायसादराय रायजी (भारतीय प्रथम क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार, जन्म: २६ जानेवारी १९२०).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖