
‘त्या’ ८१ बेवारस मृतदेहावंर होणार सामूहिक अंत्यसंस्कार
ओडीसा: ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अनेक मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. 288 मृतांपैकी 193 मृतदेहांना भुवनेश्वर येथे पाठवण्यात आलं. त्यापैकी 110 मृतदेहांची ओळख पटली असून ते त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
मात्र उर्वरित 81 मृतदेह अद्यापही बेवारस आहेत. या 81 बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारी आदेशाची प्रतीक्षा आहे. डीएनए जुळणीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या कुटुंबांना अखेर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नसतो. या सामूहिक अंत्यसंस्कारासाठी महापालिकेने अनेक भुवनेश्वरमध्ये जागा शोधल्या जात आहेत.
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश लोकांची ओळख पटवणे जवळपास अशक्य होते. AIIMS भुवनेश्वर येथे कंटेनरमध्ये ठेवलेल्या बेवारस मृतदेहांचे अवयव शरीराच्या इतर अवयवांशी जुळण्यासाठी आतापर्यंत 75 डीएनए नमुने दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मृतदेह कुजण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत, परंतु डीएनए चाचणीच्या निकालानंतर तातडीने पावले उचलली जातील.