
खुनाचा कुख्यात आरोपी
उपराजधानी हादरली..!! नागपुरात कुख्यात आरोपी आतिश ठाकरे याचा खून
_जुन्या वादातून मारामारीचे रूपांतर खुनात_
नागपूर: कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दत्तात्रय नगरमध्ये कुख्यात आरोपी आतिश ठाकरे याचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पूर्वी तडीपार होता. आतिश ठाकरे हा आपल्या तीन मित्रांसह दारू पिऊन बसला होता. जिथे जुन्या वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर तिघांनी मिळून आतिशची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी सहायक पोलिसांसह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. कळमना पोलिसांनी तपासाअंती या प्रकरणातील तीन आरोपींना तत्काळ अटक केली. आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. याप्रकरणी अधिक माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.