
‘वनाझ’ विद्या मंदिरात सावरकर गौरवगाथा
वर्षभर विविध उपक्रम सादर होणार
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: सध्या सर्वत्र “हर घर सावरकर” अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून कोथरूड येथील “वनाझ परिवार विद्या मंदिर” प्रशालेमध्ये नविन शैक्षणिक वर्षात ‘सावरकर व्याख्यानमाला’ हा कार्यक्रम अहमदनगर सावरकर प्रेमी मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. वर्षभर चालणा-या या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच प्रसिध्द वक्ते श्याम भुर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सुरेल शंख- नादाने करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. वृषाली वाशिमकर प्रास्ताविकात गौरवगाथा मालिके बद्दल बोलताना सांगितले, ” या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, सहनशीलता असे सावरकरांचे मौलीक गुण विद्यार्थ्याच्या ठायी उतरवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रशालेचा उद्देश आहे.” आपल्या प्रमुख भाषणात श्याम भुर्के यांनी सावरकरांच्या कार्याचा व व्यक्तीमत्वाचा एक एक पैलू खुमासदार पध्दतीने उलगडून सांगितला. या प्रसंगी सौ.भुर्के यांनी सावरकरांच्या साहित्यावर आधारित नाटकाचे प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वृंदा घन यांनी केले. वाय .के .कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार सौ. कावेरी गाडेकर यांनी आभार मानले. माध्यमिक विभागाचे अध्यक्ष अ.ल. देशमुख, वनाझ परिवाराचे सर्व पदाधिकारी, अहमदनगर सावरकर प्रेमी मंडळाचे सर्व सदस्य कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.