
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९० साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सावर रे मना*
सावर रे मना l किती रे धिंगाणा l
थोडा त बसना l स्थिर जरा ll १ ll
सुसाट हे मन l तुझी चपळता l
किती चंचलता l सैरावैरा ll २ ll
लागे ना रे ठाव l क्षणात धावतो l
कधी तू झोपतो l कळेनाच ll ३ ll
म्हणतात तुला l कुस्तीचे मैदान l
सर्वच हैराण l तुझ्या पुढे ll ४ ll
विनंती तुला रे l नको घालू पिंगा l
नको करू दंगा l माझ्या मना ll ५ ll
सावर रे मना l कधी त हो शांत l
बोलूया निवांत l क्षणभर ll ६ ll
*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सावर रे मना सावर
पूर आवर आसवांचा
तूच तुझा आधार हो
नको भार आठवांचा.. //
उगाच दया दाखवणे
हाच दुनियेचा प्रघात
किव अमाप करतील
होई मनावर आघात… //
नको दुःखाचे प्रदर्शन
इथे नसे कोणी गंभीर
संकटांशी लढण्यास
करावे स्वतःला खंबीर.. //
आले आता वाट्याला
जगणे सून्या भाळाने
टोकदार नजरेचे काटे
मार्गी पसरले काळाने.. //
ऐक मना ऐक आता
आत्मनिर्भरतेचे घे धडे
वज्र निर्धारा समोर या
हर संकटही फिके पडे.. //
विस्कटला खोपा जरा
आवरेन आता नव्याने
जपेन दोन्ही पिल्लांना
मी सुगरणीच्या मायेने…//
यापुढे बाप बनण्याचे
उचललेय शिवधनुष्य
ना खचेन ना पिचेन मी
वेचेन कणकण आयुष्य.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सावर रे मना
नको बेभान होवू
सावर रे तना
नको विचलित होवू
सावर रे मना
नको हैराण होवू
सावर रे तना
नको परेशान होवू
सावर रे मना
नको सैरावैरा होवू
सावर रे तना
नको संकुचित होवू
सावर रे मना
नको तराणे गाऊ
सावर रे तना
नको हर्षोल्लास होवू
सावर रे मना
नको बेधुंद गाऊ
सावर रे तना
नको बेताल वाजवू
*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
आयुष्याच्या पाऊलवाटेवरून चालताना
मिळते अनुभवांची शिदोरी
गोड कटू स्मृतींनी भरलेली
आपल्याच माणसांनी जणू भेट दिलेली
कासावीस होईल मन
पाणावतील नयन
तरीपण खंबीर मनाने तू चाल ना
सावर रे मना, सावर रे मना..
आपलेच करती आपला घात
संकटात सोडून जाती हात
धैर्य उराशी बाळगून
मार्गक्रमण कर ना….
सावर रे मना, सावर रे मना..
जरी कोसळला दुःखाचा डोंगर
मनाला आवर, थोडा धीर धर
हे ही दिवस दुःखाचे जातील तुझे
हीच मनी ठेव भावना….
सावर रे मना, सावर रे मना..
नैराश्याच्या गर्तेत स्वतःला न खेचता
आधार बन स्वतःचा, निर्णय घे आता
एक बंद झाला तरी दूसरे उघडेल द्वार
परिस्थितीशी झुंजत रहा मानू नको हार
हे सारं करताना विसरून जा वेदना…..
सावर रे मना, सावर रे मना…..
*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सावर रे मना
नको पळूस सैरभैर
तुझ्या चंचल स्वभावाला
कशी घालावी आवर
सावर रे मना
तू किती रे अधीर
तुझं वागणं बेभान
तुला कसा ना धीर
सावर रे मना
तुला प्रकाशाचा वेग
दही दिशात वावरतोस
घेत भरारी उतुंग
सावर रे मना
कधी होना धीरगंभीर
तुझ्याशी हितगुज कराया
मी झाली रे आतुर
सावर रे मना
नको होऊस उदास
स्वार्थी ही दुनिया
केवळ मृगजळाचा भास
*सौ, इंदु मुडे ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*सावर रे मना*
नैराश्याला मिठीत घेऊन
आत्मदहनाचा नको गुन्हा..
सावर रे मना माणसा, सावर रे मना||धृ||
नदी काठावरील, बघ ते लव्हाळे
झेलले किती त्यांनी, महापूर न वादळे
पर, नाही सोडली आपुली धरा.. ||१||
सावर रे मना माणसा…
बाभुळ झाडावरील बगळ्यांचा घर बघा
रक्षणार्थ थाटला काट्यावर संसार हा
संकटाने नकोस होऊ हतबल तू असा||२||
सावर रे मना माणसा…
पाठीवरील विंचवाचे बि-हाळ तू पहा
कर्तव्यासोबत चालतो जीव हा
कर्तव्याला पाठ दाखवून पडतो तू कसा? ||३||
सावर रे मना माणसा…
*सौ वनिता गभने*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सुखदुःख जीवनाचा भाग
प्राधान्याने जप आरोग्यधना
वेळेवरती येऊ दे तुला जाग
आरोग्यासाठी *सावर रे मना* …१…
जिभेचे चोचले पुरविण्यास
धन्य मानते ही वर्तमान पिढी
काहीही व्याधी होवो त्यांस
सतत भागविती तोंडाची गोडी …२…
छोट्याछोट्या गोष्टींचा राग
घालतात हे बऱ्याचदा डोक्यात
कसे अडकलो लागेचना थांग
सुखी जीव पडतो ह्याने धोक्यात …३…
तूच हो मार्गदर्शक,हितचिंतक
लिही माझ्या भाग्यतील भविष्य
करील मी त्यास्तव यत्न अथक
देतो मी परीपूर्तीचे वचन अवश्य …४…
*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*अंबरनाथ जि. ठाणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सावर रे मना
होऊ नको हळवा
चैन पडे न जीवा
का रे मना चंचल
भटकतो चहूदिशा
तू जीवनाची आशा
दुःखानी व्यापले जीवन
अश्रु वाहती झरझर
मार सुखाची फुंकर
का रे मना व्याकुळ
शोधतो आशेचा किरण
बळकट कर जीवन
सावर रे मना मज
मी झाले आहे अगतिक
तूच मार्ग पथिक
गोंधळलेले मन
येण्या स्थिरत्व जीवा
शांतीचा मार्ग नवा
सावर रे मना
करू नको भ्रमित
जप विचाराची रीत
*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
साईनगर,अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
परीक्षा घेण्यासाठी
संकटे येतील जातील,
नकोघाबरू,सावर रे मना
नसता जण हसे होईल.
घेतलेला संकल्प पूर्ण
जर,नेक इरादा असेल,
तर संकटावर मात करू
मग,यश हमखास येईल.
निर्भीड, बिनधास्त मन
साजेसे तुझ्या विचारास,
आत्मविश्वास जागृत कर
विचार प्रश्न अंतर्मणास.
चिंता अन काळजी
पोखरेल तुज्या मनाला
हिम्मत सोडू नकोस
सांभाळ स्वतःला.
*मायादेवी गायकवाड*
मानवत परभणी
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🪷🎍🪷♾️♾️♾️♾️
*सावर रे मना*
सोड क्षणिक मोहमाया
हा सगळा फापटपसारा
संपत्ती जमवण्यातच
झिजला रे देह सारा
माझे माझे म्हणून
जपतोस जे दिनरात
हा मोहच करेल रे
कधीतरी तुझा घात
कर जन्माचे सार्थक
गरजूंना देऊन दानधर्म
ईश्वरच्या नामस्मरणाने
जीवनाचे कळेल मर्म
ठेऊन शुद्ध आचरण
जप मनात सेवाभाव
दृढविश्वासावर संकटात
पैलतीरी जाईल नाव
नश्वर रे हा देह मानवा
कर आयुष्याचे सोने
सावर रे मना आतातरी
विसरून ते उणे दुणे.
*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*