अश्रू..

अश्रू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नयन माझे पाणावलेले,
तरीही अश्रू माझे सुखलेले||धृ||

व्यथा माझ्या हृदयीची,
न कळावी कुणासही,
ढाळून अश्रू सुजतील नयन,
चिंतेतून जळतील तनमन||१||
नयन माझे पाणावलेले……

जीवनदुःखे सारी मी पचवलेली,
सगळी रहस्यं पोटात साठवलेली,
दु:खाचा प्याला टाकलाय गिळून
आतातरी होईल सुखाचे आगमन||२||
नयन माझे पाणावलेले……….

माझे अश्रू मीच पिऊन टाकले,
भावी आयुष्यासाठी खंबीर ठाकले,
सुखाच्या शोधात उगीच धावले,
आणि विश्वासघाताचे दान पावले||३||
नयन माझे पाणावलेले……..

प्यायलेल्या अश्रूंचा समुद्र झाला जीवनी,
दुःख आणि अश्रू त्यात लुप्त भिऊनी,
जगणे कशासाठी, रडणे कशासाठी,
गहाण टाकलेल्या जिंदगीची कहाणी कशासाठी||४||
नयन माझे पाणावलेले…..

दुःख या जीवनाचे,
गारांपरी विरघळावे,
सुख या तनमनाचे,
दगडांतूनही पाझरावे||५||
नयन माझे पाणावलेले…….

न राहो कुणावरही,
भार या जीवनाचा,
ना राग,लोभ, ईर्षा कुणाची,
सदा राहो भावना ही गहिवराची||६||
नयना माझे पाणावलेले…..

दुःख असले जरी मनी,
तरी त्याचा हुंदका न येई कानी,
दुःखाची होऊन वाफ,
सदा राहो क्षण तो माफ||७||

उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी ,नागपूर
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles