
मला बाई वारीला जायाचं
मला बाई वारीला जायाचं
समस्त वारकऱ्यांना भेटायचं
अवलोकन आध्यात्मिक मार्गाचं
वारकऱ्यांच्या भक्तिभावाचं
दर्शन जवळून मला घ्यायचं
भक्तीभावात न्हाऊन निघायचं
मला बाई वारीला जायचं
हरी भजनाच्या रंगी रंगायचं
वय विसरून मनसोक्त नाचायचं
पांडुरंग भेटीच्या ओढीचं
गुपित जाणून घ्यायचं
निर्व्याज भक्तीच वेड अनुभवायचं
मला बाई वारीला जायाचं
माझ्या विठू माउलीला भेटायचं
कारण जगातील साऱ्या दुःखाचं
निर्विकल्प सत्याच्या मार्गाचं
कोडं आनंददायी जगण्याचं
पांडुरंगाजवळ उलगडायचं
मला बाई वारीला जायाचं
मला बाई वारीला जायाचं
डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद
=======