काव्यठसा..

काव्यठसापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ओवी ज्ञानेशाची
गोडी किती त्यात
ग्रंथ ज्ञानेश्वरी
पसाय विख्यात //

गाथा अभंगाचा
संत तुकोबांचा
विचार सार्थक
समाजमनाचा //

भारूड नाथाचे
लोकप्रिय अंग
एका जनार्दनी
सज्जनांचा संग //

बहिणाबाईची
थोरवी आपार
गायिल्या जातात
ओव्या जात्यावर //

दोहे कबीराचे
हे जीवनसार
दूरदृष्टी होती
कवणात फार //

संताचा महिमा
पहावा जरासा
संत साहित्यात
दिसे काव्यठसा…..
दिसे काव्यठसा…. //

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि. उस्मानाबाद
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles