आमचे आण्णा आजही मनात आहेत..!!

आमचे आण्णा आजही मनात आहेत..!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आण्णा तुम्ही सोडून जाऊन आज पूर्ण 21वर्ष झाली आहेत. या 21 वर्षामध्ये असा एक दिवसही गेला नाही की, तुमची आठवण नाही.आई मुलांना जन्म देऊन या जगात आणते तर वडील आपल्या मुलांना चांगले सुसंस्कृत, सुशिक्षित, माणूस म्हणून उभे करण्याचे कार्य करतात.आपलं बोटं धरण्यापासून स्वतः चा हात आपल्या हाती देण्यापर्यंत वडील सोबत असतात. आज तुमच्यामुळे आम्ही सर्व खुप सुखी आहोत. पण या सुखामध्ये तुम्ही नाही. वडील असतो आपल्या कुटुंबाला आधार, संरक्षण करतो दूर राहुन सुध्दा, आपल्या लेकरांना कोणतेही संकट येऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्न करतात.

तुम्ही गेल्यावर कळलं.. आण्णा हा “आऽऽण्णा असतो. तो आभाळासम विशाल असतो, तर कधी त्याच आभाळाखालच्या घराचे छत असतो तुम्ही गेल्यावर हे कळंल..! डोक्यावरचं छप्पर गेल्यावर कळलं, आई जरी सुई सारखी फाटक्या संसाराला शिवणारी पण, आण्णा तुम्ही मात्र धागा असता. शिवलेल्या कुटुंबाला बांधून ठेवणारी विण ही असतो तुम्ही दोघेही गेल्यावर हे कळलं… संसाराची घडी कशी असते. तुम्ही आईचे सौभाग्य. तिच्या कुंकू जोडव्याचा धनी असता… तुम्ही चिडलावर, रागावलावर तरी गरम दुधावर साचलेली साय असते. तुम्ही गेल्यावर हे कळलं… जीवनाच्या धगीत दुध ऊतू गेल्यावर कळलं. आण्णा हा खरं तर फणसाचे प्रतिक असतो.बाहेरून जरी बोचला तरी आतून मात्र प्रेमाचा गोडवा वंसत असतो.तुम्ही गेल्यावर हे कळलं आण्णा.. आयुष्यातला गोडवा हरवल्यावर कळलं
खेड्यात किराणा दुकानांमध्ये गावातील लोकांनी माती मिक्स करून धान्य विकत होती,ते वडील निट निटके करण्यासाठी लागणारे कष्ट करून प्रसंगी उपाशी राहून आमची खळगी भरणारा बाप असतो.

दुष्काळाच्या उन्हात जळता जळता आमच्यावर सावली धरणारा, त्या झळांपासून वाचवणारा वटवृक्ष असतो..
तुम्ही गेल्यावर हे कळलं……. आमचीच सावली हरवल्यावर कळलं.. आत्ता आठवतो तुम्ही पोटतिडकीने शिकवत होता
जगाची रीत शिकण्याची तेव्हा सवयच नव्हती
तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला सवडच नव्हती..
तुम्ही गेल्यावर हे कळलं… जगाने त्याची रीत दाखवल्यावर कळलं.तुझी माती कुठली रे हे मला कळलंच नाही
अवचित मातीत मिसळलास तरी सुद्धा कळलं नाही…
पोरके आम्ही झालो तेव्हा खूप उशीर रे झाला होता….
तुमच्यासाठी फक्त हंबरडा फोडण्यासाठी जणू फक्त जीव उरला होता. तुम्ही गेल्यावर कळलं बाबा.. रडण्यासाठीचे अश्रू आटल्यावर कळलं. बाबा बाबाऽऽ बाबाऽऽऽ “तुम्ही परत या” हे बोलण्याचा अधिकार गमावून बसलोय
तुमच्या एका एका बोलाला नुसतं आठवात घेऊन बसलोय.. तुम्ही गेल्यावर हे कळलं.. त्या बोलाचं मोल जगासमोर आल्यावर कळलं.मी वचन देतो आण्णा तुम्हाला…
तुमचा प्रत्येक शब्द, इच्छा मनात कोरून ठेवलाय. तुमच्या स्वप्नांना मुर्तरूप मी दईन, तुमचाच …… !!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी
भारत विद्यालय बेडगा, उस्मानाबाद
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles