आदिवासी स्त्री काल, आज आणि उद्या

आदिवासी स्त्री काल, आज आणि उद्यापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतीय आदिवासी महिला वर्ग हा फार पूर्वीपासून मातृसत्ताक परंपरेचा पाईक आहे.आदिम स्त्रियांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते.आदिम समाजामध्ये ‘देज’ ही प्रथा होती. आजही काही आदिवासी भागात ही प्रथा अस्तित्वात आहे. ‘देज’ म्हणजे धन-धान्य , पाळीव प्राणी जसे- गाय, बकरी,कोंबड्या,इ.जे आर्थिक स्त्रोत वाढवणारे असतात.लग्नाच्या वेळी नवऱ्या मुलीला देण्यात येणारी सामग्री म्हणजे ‘देज’ देत असे. मुलगा मुलीकडे राहायला येतो त्याला घरजावई असे संबोधले जाई. यावरून पूर्वी आदिवासी समाजामधील स्त्रीचे कुटुंब संस्थेतील स्थान,महत्व लक्षात येते, जी कुटुंबाला एकसंघ ठेवते.आजही घरजावई ही आदिवासी पाड्यांमध्ये परंपरा अस्तित्वात आहे.घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मत मांडण्याचा, निर्णय घेण्याचाअधिकार तिला आहे सण- समारंभामध्ये महिलांचा सहभाग, त्याची यशस्वी अंमलबजावणी, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय अशा विविध गोष्टींमध्ये आदीम स्त्रिया महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असत.

काळापरत्वे जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असते.मात्र आपल्या संस्कृतीपासून पूर्णत: वेगळे होणे,आपल्या अस्तित्वाला तिलांजली देणे संयुक्तिक नाही.
स्त्री ही सृजनाची उद्गगाती म्हटले जाते.तिने जर ठरवलं तर ती कठीणातील कठीण प्रसंग पार करते. स्त्री हळवीअसली तरी धीरोदात्त आहे.वेळप्रसंगी पौरूषत्वाला नमते घ्यायला लागेल एवढे सामर्थ्य तिच्यात आहे. कल्पक व दूरदर्शी नेतृत्वात कार्याची यशस्विता दडलेली असते.इतिहासामधील दाखले याची साक्ष देतात.आदिवासी स्त्रियांची जीवनपद्धती एक आदर्श जीवनपद्धती आहे.ती कधीच नव-याच्या नावे व्रतवैकल्ये करीत नसे.तो मृत झाल्यानंतर बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे या प्रथा नव्हत्या.या संस्कृतीत मृत व्यक्तीला मातीत पुरून व त्या ठिकाणी मोहाचे झाड लावण्यात येते
.काळानुसार आदिवासी जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत.बाह्य जगाचे अनुकरण करत आदिम जमात स्व- अस्तित्वापासून भटकलेली आहे. सुदृढ मातृत्व असलेली आदिम स्त्री आज कुपोषणाच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे.

अज्ञान,अशिक्षित पणामुळे अंधश्रद्धेच्या व व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेली आहे.यात ‘गोठुल’ प्रथा गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आजही अस्तित्वात आहे. गोठुलमधे स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असते.म्हणजे आदिवासी स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य असते. लैंगिक स्वातंत्र्यापासून ते अन्यायाविरुद्ध ती निकराने लढायची.
मात्र आज परिस्थिती बदललेली आहे.जिच्यापासून सुरक्षितता मिळायची तीच आज सुरक्षित नाही. सध्य स्थितीमध्ये आदिवासी स्त्री जगण्याच्या जीवघेण्या संघर्षात भरडून निघालेली आहे.त्यांचे जगणे आज असंख्य प्रश्नांनी अनुत्तरीत आहेत.

जल,जंगल आणि जमिनीवरच्या प्रस्थापितांच्या आक्रमणामुळे ती हतबल झाली.. ती कधीच हुंड्यास बळी पडली नाही. आज मात्र तिच्या स्वप्नांचा समाजात लिलाव होताना दिसत आहे.आज ती कुपोषण व कुमारी माता या भीषण दुष्टचक्रात अडकलेली आहे.आदिम स्त्रियांच्या असंख्य प्रश्नांच्या निराकरणासाठी आज सर्वसमावेशक दर्जेदार सर्वांगीण शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षणासारखे प्रभावी माध्यम स्वीकारणं,अंगीकारण,विस्तारणं आज अत्यंत गरजेचे आहे.

आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles