माय..

माय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माय राबली शेतात
कष्ट लिहिलेले भाळी
नाही रिकामी पाहिली
तिच्या कर्तृत्वाची झोळी..१

घराच्या सुखासाठी तिनं
कष्ट सोसले अपार
किती खाल्या खस्ता
नाही त्याला पारावार …२

रात्रंदिवस आम्हा होता
मायेचा आधार
नाही कधीच आटला
तिच्या प्रेमाचा सागर…३

तिने जोजविले मला
तिने वाढविले मला
संस्कार देऊनिया उत्तम
तिने घडविले मला…४

शिक्षणासाठी माझ्या
कष्ट उपसले तिने फार
काही कमी पडू न दिले
केवढे तिचे उपकार …५

सुखी जीवन आज माझे
ही तिचीच पुण्याई
कसे पांग फेडू माय
कसा होऊ उतराई…६

तुला सुखात ठेवावे
मनी योजिले होते सारे
दैवलेख कळला नाही
कसे फिरले ग्रहतारे…७

मला एकटा सोडून
कशी गेलीस तू गं माय
नाही पाहिली कधी नंतर
मी दुधावरती गं साय…८

मी भांडलो देवाशी
का कोपला असा
काळ आला तेव्हाच
तू झोपला कसा…९

दिले देवाने उत्तर
ते ऐक गं माय
जीवनाचे सार्थक झाले तुझ्या
स्वर्गलोकी लागले पाय..१०

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत,जि.रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles