भूगंध

भूगंध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आकाशात ढगांची दाटी झाली
आतूर झाले सारे, बरसायला,
पडता,पहिला थेंब पावसाचा
आला,आला, भुगंध मातीला.

सर्व सुगंधाला मागे सारेल
असा दर्प,मातीचा सुटला,
प्रितवेडे आकाश आतुरले
भेटण्या विरहिणी धरतीला.

व्याकुळ होऊन धरा पाहते
आतुर,आशाळभूत नजरेने,
कासावीस झाली माझी लेकरे
क्षमव दाह,तू,जल वर्षावाने.

विरहाचे आश्रू बरसले
धरती ओलीचिंब झाली,
पाऊस राजाचे स्वागत
करण्यासाठी,ती सुखावली.

पशु पक्षी किलबिल करती
तरुला फुटली पालवी,
नदी सागर तुडुंब भरतील
पण,तुझी साथ सर्वांना हवी.

मायादेवी गायकवाड
मानवत, परभणी
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles