
प्रवीण मुंडे ठाणेदार खापरखेडा यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचा प्रयत्न; अरविंद गजभिये
नागपूर: खापरखेडा येथील ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या विरोधात खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही नेते व तेथील गुन्हेगांरानी षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक करीत आहे. हे खोटं असून वलनी चे सरपंच अरविंद गजभिये यांनी पत्रपरिषदेत ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या बद्दल पत्रकारांना सांगितले की, प्रवीण मुंडे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यांच्याविषयी रचलेले सर्व आरोप खोटे आहेत.
वलनी व परिसरातील नागरीक ठाणेदार प्रवीण मुंडे यांना समर्थन देत आहे. प्रवीण मुंडे यांना काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी व अवैध धंदे वाल्यांनी तसेच राजकीय नेताच्या पुढार्यांच्या संगणमताने षडयंत्र रचून त्यांना फसविण्यात आले होते. मुंडे हे खापरखेडा पोलीस स्टेशनला एक वर्षांपूर्वी रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी अवैध धंदे, शाळेकरी मुलांची छेळ – खाणी यावर आळा बसला होता. मुंडे यांची बदली होतात खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील वलनी खदान, चनकापूर, सिल्लेवाडा हे अति संवेदनशील क्षेत्र म्हणून पोलीस विभागात यांची नोंद आहे. मुंडे यांची बदलीची माहिती गुन्हेगारांना मिळतात त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला. काही लोकांनी तर मुंडन केले. त्यांची व्हिडिओ चौकाचौकात वाजवत आहे.
जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुंडे यांच्या कार्यकाळात लपून बसले होते व फरार झाले होते ते लोक मुंडे साहेब जातात परिसरात सक्रिय झाले. त्यामुळे वलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिषदेत सरपंच वलनी, दहेगाव रोहणा, भानेगांव, ईसापुर सरपंच व वलनी सरपंच परिसरातील नागरिकांकडून मागणी आहे की , ठाणेदार प्रवीण मुंडे यांना पुन्हा खापरखेडा पोलीस स्टेशन येथे रुजू करण्यात यावे. अशी गावकऱ्यांची मागणी आहे. भविष्यात या परिसरात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांची बदली करून पोलीस स्टेशनला रुजू करण्यात यावं. अशी पत्रकार परिषद मध्ये सरपंच अरंविद गजभिये यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
याप्रसंगी जवळजवळ 50 ते 60 कार्यकर्ते महिला सह व गावकरी उपस्थित होते.