मोदी मंत्रिमंडळात होणार फेरबदल, दाक्षिणात्य सुपरस्टारची वर्णी लागण्याची शक्यता

मोदी मंत्रिमंडळात होणार फेरबदल, दाक्षिणात्य सुपरस्टारची वर्णी लागण्याची शक्यता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 ला आता एका वर्षाचा अवधी उरला आहे. त्या दृष्टीने भाजपने (BJP) आता जोरदार तयारी सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ (Cabinet) आणि पक्षात मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. मल्यालम सुपरस्टार सुरेश गोपी यांना मोदी मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाहा (Amit Shah) आणि पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबर पक्षातही मोठे बदल होण्याच्याही चर्चा आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही मंत्र्यांना पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, तर काही खासदारांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं जाईल. 140 सदस्य असलेल्या केरळ विधानसभेत भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्या दृष्टीने भाजपने आता तयारी सुरु केली आहे. मल्याळम अभिनेते सुरेश गोपी हे आता 65 वर्षांचे आहेत. त्यामुळे केरळात पाय रोवण्यासाठी त्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागू शकते. पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती स्विकारण्यास तयार असल्याचं सुरेस गोपी यांनी म्हटलंय.

2014 मध्ये सुरेश गोपी यांना पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं, त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला. आता पक्ष त्यांना मोठी जबादारी देण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पसमांदा मुस्लिम समुदायाच्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित करत 2024 निवडणुकीची आपली रणनिती स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पसमांदा मुस्लिम हा एक मोठा मुद्दा होऊ शकतो. भाजपने पसमांदा मुस्लिम समुदायासाठी कार्यक्रम निश्चित केला आहे. पसमांदा हा एक फारसी शब्द आहे. याचा अर्थ उपेक्षित वर्ग. भेदभाव आणि उपेक्षित राहिलेल्या या समाजाचा मु्द्दा मोदी सरकारसाठी गेमचेंजर ठरू शकतो.

दरम्यान, भाजपने बिहारवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. जेडीयूशी युती तुटल्यानंतर भाजपने ‘प्लान P’ वर लक्ष केंद्रीय केलं आहे. बिहारमध्ये पसमांदा मुस्लिमांचा वापर करत कधी काँग्रेस तर कधी आरजेडी आणि जेडीयूने बिहारमध्ये सरकार बनवलं. आता भाजपने या समुदावर लक्ष दिलं आहे. या समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपने वेगवेगळ्या योजना आणण्याचं ठरवलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles