बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चारोळी_स्वयंसिद्ध*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हरवून टाक संकटाना
कर सामना वादळाशी
स्वयंसिद्ध तू नरवीर
यश येईल पायाशी

*सौ. शशी मदनकर , ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

कर्तृत्वाने स्वयंसिद्ध होऊन
स्रीने उमटविला ठसा दाही दिशा
कर्तबगारी स्त्रीयांची प्रेरणा
घेऊन उंचावल्या तिच्या आशा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

स्व,अस्तित्वाचा शोध घेऊन
स्वतःला स्वयंसिद्ध करावे,
सक्षमीकरणाची कास धरून
यशाच्या शिखरावरती पोहचावे.

*मायादेवी गायकवाड*
मानवत,परभणी
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

स्वयंसिद्ध हो तू मनूजा ..
पेलण्या नवयुगाची आव्हाने
सशक्त बन नवनिर्माणासाठी
समृद्ध कर मनाची दालने ..

*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©परीक्षक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*स्वयंसिध्द*

स्वतःला करून स्वयंसिध्द
काढतो सुखाचा सातबारा
लावून सुखी संसाराचे झाड
हमखास येऊ द्या अंगीकारा,.,

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

सखी तुझ्याशी जुळले सूर
होतोय आनंद मजला भरपूर
स्वयंसिद्ध देवाचेच एक मंदिर
देवा तुझे आशिर्वाद दे लवकर

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

हे स्त्री स्वयंसिद्ध तू, सशक्त तू,
जिजाबाई -सावित्रीची लेक तू,
आठव इतिहास आपला,
तू अबला नाही आहेस सबला||

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत,*
फ्रेंड्स कॉलनी, नागपूर .
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

स्वयंसिद्ध करण्याचा संघर्ष
गर्भातूनच तिचा सुरू होतो
जन्म-मृत्यूच्या दारातून बाहेर पडूनही
आत्मसन्मान वाचविण्यात जन्म निघून जातो

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*चारोळी—स्वयंसिद्ध*

सावित्रीच्या लेकी आम्ही
स्वयंसिद्ध आम्ही नारी
शिक्षणाचे गिरवून धडे
घेतली प्रत्येक क्षेत्रात भरारी

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिध्द*

*प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक*
*स्वयंसिध्द व्हावे*॥
*यशस्वी जीवनासाठी*
*स्वतःशीच वचनबध्द व्हावे*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

स्वयंसिद्ध बन तू
झेलण्या संकटांना
कर समृद्ध स्वतःला
तोंड देण्या आव्हानांना

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

चांगले-वाईट ओळखून
सत्याची कास धरुया
प्रयत्नांची पराकाष्ठा करुन
स्व-कष्टाने स्वयंसिद्ध होऊया

*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिद्ध*

नव युगातील नवी आव्हाने
पेलेल जो होईल तो प्रसिद्ध
आत्मनिर्भर वेळीच बनण्यास
व्हावे लागेल आपणास स्वयंसिद्ध

*दत्ता काजळे उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🚩🔹🚩♾️♾️♾️♾️
*स्वयंसिध्द*

कोणत्याही गोष्टीअशक्य नसतात
ठरवल्या तर सिद्ध होऊ शकतात
घेतलेले निर्णय फक्त स्वतःला
स्वयंसिद्ध कराव्या लागतात

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles