पुण्यश्लोक अहिल्याबाई..

पुण्यश्लोक अहिल्याबाई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तू रणरागिणी ,दामिनी मुत्सद्दी राजकारणी
बालपणापासून धाडसी ,वीरधुरंदर गजगामिणी

तू मायेची मूर्ती ,गरीबांची अन्नदात्री
प्रजेची माता, बनलीस विजयाची खात्री

तू संकटसमयी संयमाची परीक्षा, मल्हाररावांची स्नुषा
गौतमाराणीचा विश्वास,दरबाराची मनिषा

तू न्यायप्रिय समाजसंरक्षक, चौफेर माळव्यात किर्ती
बनलीस रीपूदमण,अंतातही आरंभ शोधीशी

तू खंडेरावची पत्नी, समजून घेशी कर्तव्या
संहार क्रोधास बनली अटकळ, शोभलीस भार्या

तू स्वपुत्रासही दिली न माफी,जनतेची दाता
दारे उघडलीस ज्ञानाची, स्वावलंबनाची स्त्रियांकरीता

तू अनिष्ट प्रथेविरूद्ध लढलीस, पत्करून समाजविरोध
स्वविचारांवर ठाम, कोणी करो किती अवरोध

तू प्रजावत्सल,तू मानवतेचे आचरण
कुटूंबाचा विश्वास सांभाळून,केले राजकारण

तू चौंडी जन्मगावास, केले इतिहासात अजरामर
तवकिर्तीस गौरवण्या शब्द अपुरे, आम्ही पामर

तू शिवशंभोची पुजारण, मंदिर जीर्णोद्धाराची ग्वाही
सोडून राजवैभव, बनलीस पुण्यश्लोक अहिल्याबाई

शर्मिला देशमुख -घुमरे ता.केज जि.बीड
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles