
पापभिरू
करून करार जिंदगीशी तू फरार होवू नको
तुझ्याच घरच्या भिंतीची तू दरार होवू नको
होतच असतो खिळे ठोकता वार भिंतीवर
ते घाव सारे झेलताना तू अंगार होवू नको
करुन कृत्य पापाचे का पापभिरू झालास
आता लपवुन मुखवटा तू बेकार होवू नको
मशाल होता होता कित्येक देहही जाळलेस
तो डुबवून सूर्य अपेक्षेचा तू अंधार होवू नको
पळ काढाया आता तुझा चालला आटापिटा
कर सामना या जिंदगीशी तू भरार होवू नको
करून करार जिंदगीशी तू फरार होवू नको
तुझ्याच घरच्या भिंतीची तू दरार होवू नको
मोहिनी निनावे
आनंद नगर, नागपूर
======