ती वाट दूर जाते..

ती वाट दूर जाते



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ती वाट दूर जाते
जिचा नाही काही अंत,
कधी संपणार प्रवास
ही आगळीच खंत…..

कसा सावरावा तोल
कसे आकळावे बंध,
असेल का कवाड उघडे
की तेही कुलूपबंद….

नाही ठाऊक दिशाही
निघालो आहे जिकडे,
अपेक्षित ते सारे
मिळणार का तिकडे….

आशेचे पंख लावून
घेतली उंच भरारी,
वाट चालताना नवी
तोडली बंधने सारी….

जखमा अशा सोसल्या
भाव मनी आटलेला,
नाही शोधला आनंद
जो अंतरी दाटलेला…..

झुंजलो वादळाशी त्या
पेलली कटू आव्हाने,
काय साध्य होणार होते
या तुटक्या पराक्रमाने..

अनोखी चाल माझी
वाटेसही त्या कळेना,
केवढे साचले मळभ
कोडे काही सुटेना…

सुखासाठी प्रवास असा
सुरू राहीला नितांत,
श्रमलो बहुत आता
जागा शोधतो निवांत ..

नको स्वतःशी प्रतारणा
नको स्पर्धा आपल्यांशी,
थांबा असेल कुठे जर
का खेळावे स्वप्नांशी….

परतावे माघारी आता
नको ती वाट नवी,
जीवलगांची सोबत
नित्य मला हवी….

राहील तेथे स्वस्थ
सुखद अंतःकरणाने,
गाईन मनमुराद स्वमुखे
सुरेल ते जीवनगाणे ….

झालासे आज असा
साक्षात्कार तो नवा,
त्वरे सोडिला त्या
दूरच्या वाटेचा काजवा….

परतलो आता आहे
क्षण सुखाचे शोधीन म्हणतो
आपल्याच माणसांसवे
आयुष्य आनंदे वेचीन म्हणतो….

थांबलो आहे आता जर
नवी क्षितिजे पाहीन
सुखदुःखाच्या प्रसंगी
सवे आपल्या राहीन …

वाट अशी का असावी
जी दूर दूर जाते,
माणसातल्या माणसाला
माणसातून दूर नेते….

चालेन वाट आता जी
माणसाशी जोडेल,
प्रेम,आपुली,जिव्हाळा
कणकणाने वाढेल……

पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत,जि रायगड
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles