
ओझे
दप्तराचे ओझे
पाठ वाकली
पदव्यांचा ढिग
मान ताठली…..१
आभासी तत्वज्ञान
पिढ्या नासती,
कौशल्याचा बोजवारा
फौज बेरोजगारांची वाढती….२
रिकामा खिसा
अन,पुस्तकांचा ढिगारा
सरून गेलं आयुष्य
बाजार हिंडताना….३
सत्तेची आयाळ
बुरखा पांघरली
पिढी नवतीची,
गुलामगिरीत चालली….४
शिक्षणाचा इथे
बाजार भरला,
अभ्यासक्रम चाळतांना
व्यवहारज्ञान कळेना….५
स्वावलंबी शिक्षण
हाच खरा मार्ग
अर्थपूर्ण साक्षरता
जीवन करी सार्थ…..६
पैठणकर. के.आर.
जि.नाशिक
=====