
केंद्रप्रमुख हरिश्चंद्र गाढवे यांचा सपत्निक सेवापूर्ती सत्कार
स्वाती मराडे, पुणे
पुणे: दि. ३०/०६/२०२३ रोजी सेवानिवृत्त झालेले कळस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हरिश्चंद्र गाढवे साहेब यांचा सेवापूर्ती कार्यक्रम कळस या ठिकाणी पार पडला. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षकांतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, चांदीची गणेशमूर्ती देऊन साहेबांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषद सदस्या, माजी सभापती महिला बालकल्याण पुणे जिल्हा परिषद सौ.वैशालीताई प्रतापराव पाटील, कळस गावचे सरपंच सौ. सविता सुरेश खारतोडे, उपसरपंच श्री. विशाल राजेभोसले, श्री. सुरेश खारतोडे, श्री. संग्राम पाटील त्याचप्रमाणे इंदापूर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. अजिंक्य खरात साहेब, विस्ताराधिकारी श्री. भिवा हगारे साहेब, श्री.मारुती सुपुते साहेब, श्री.नवनाथ ओमासे साहेब, श्री. संभाजी आजबे साहेब, श्री. हनुमंत देवकाते साहेब, श्री. ह.दि.शिंदे साहेब, श्री. बाबीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर,अकोले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सानप सर, विषयतज्ञ श्री. करे सर, श्री.सावंत सर, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे विद्यमान संचालक श्री. अनिल शिंदे सर, श्री. किशोर वाघ सर, श्री. सदाशिव रणदिवे सर, सोसायटीचे माजी उपसभापती श्री. सुरेश पांढरे सर, श्री. हनुमंत दराडे सर, तसेच केंद्रातील सर्वच शिक्षक व महिला वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन वणवे यांनी केले. प्रास्ताविक श्री. कैलास मराडे यांनी केले व आभार श्री. विलास पानसरे यांनी मानले.