करूया निसर्गाचे संवर्धन

करूया निसर्गाचे संवर्धनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वृक्षतोड थांबवा, शहरीकरण थांबवा
जीव माझा हा जळतो आहे
ही धरणीमाय झीज होऊन तुटते आहे ।। धृ ।।

पृथ्वीच्या पाठीवरती ह्या टोलेजंग इमारती
नजर फिरवा चोहीकडे दिसत नाही माती
आतल्या आत उष्णतेचा गोळा गरगर फिरतो आहे
ही धरणीमाय झीज होऊन तुटते आहे ।। १ ।।

प्रदूषणाने केला कहर,पर्यावरणात फुटेना बहर
वृक्षारोपणाच्या बाबतीत व्हावे आता सर्वांनी साक्षर
एक मूल, एक झाड ह्याचे पालन करायचे आहे
ही धरणीमाय झीज होऊन तुटते आहे ।। २ ।।

नको रासायनिक खते,नको काँक्रीटचे रस्ते
पर्यावरण पोषक शेतीचे पटवू महत्व अस्तेअस्ते
शुद्ध भाज्या, फळे व धान्य ही काळाची गरज आहे
ही धरणीमाय झीज होऊन तुटते आहे ।। ३ ।।

आरोग्यदायी जीवनासाठी देऊ पर्यावरणास हाक
सर्व व्यवहार करतांना ठेऊ आपले मनसुबे पाक
जाऊ भूतकाळात वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहे
ही धरणीमाय झीज होऊन तुटते आहे ।। ४ ।।

नितीन झुंबरलाल खंडागळे
अंबरनाथ जि. ठाणे
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles