
पुसद शहरातील रस्त्यामधील खड्यात बेश्रम जातीच्या झाडाचे वृक्षारोपण
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: शहरातील रस्त्यांची अवस्था बघितली असता , अतिशय बिकट स्वरूपाचे आपल्या सर्वांना ते दिसून येते.परंतु असे असून सुद्धा आणि हे सर्व बाब नगरपालिका पुसद येथील मुख्याधिकारी तथा बांधकाम विभाग अभियंता तथा इंजिनियर या सर्वांना माहीत असून सुद्धा ह्या अशा गंभीर बाबीवर यांच्यामार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
परिणामी पुसदच्या जनतेला नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे . सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाला आणि पुसद शहरातील सर्व रस्त्यावरील खड्ड्यांनी अक्षरशः तलावाचे स्वरूप घेतलेले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण तर वाढलेच परंतु यामुळे पुसदकरांच्या जीवित्वास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे.
असे असून सुद्धा पुसद शहरातील नगरपालिका व पुसद शहराला लाभलेले तीनही आमदार, लोक प्रतिनिधी यांनी फक्त यावर बघ्याची भूमिका घेतलेली आहे. या सर्व बाबींमुळे पुसदचा विकास थांबलेला आहे.
दि.६ जुलै २०२३ रोजी अखिल भारतीय हिंद सेना ( संस्थापक अध्यक्ष – एडवोकेट अनिल ठाकूर ) यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय हिंद सेना युवा शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रथम मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांना निवेदन दिले. व नंतर पुसद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सुभाष चंद्र बोस चौक या रस्त्यामधील असलेल्या खड्ड्यात बेश्रमाचे झाडे लावून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आणि कामचुकार प्रवृत्ती विरुद्ध निषेध नोंदविला.
नगर पालिका पुसद यांना सदर निवेदन देतेवेळी रवी मोगरे , ऋषिकेश जोगदंडे , भैय्यासाहेब मनवर , अक्षय पेंढारकर , भरत शर्मा , दिलीप अंभोरे , ओम पवार , कार्तिक टाक , शुभम सांबरे , अजय विश्वकर्मा , सागर ठाकूर इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.