सौरभ चटुले सेट परीक्षा उत्तीर्ण

सौरभ चटुले सेट परीक्षा उत्तीर्ण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद: वरीष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदा करीता आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट 2023 (शा.शिक्षण)पुसद येथील प्रा. डाॅ.केशव चेटुले यांचा मुलगा सौरभ नुकताच उत्तीर्ण झाला आहे.

महाराष्ट्र राज्या करीता यु जी सी ची अधिकृत एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
द्वारा सहाय्यक प्राध्यापक पदा करीता आवश्यक ही परीक्षा मार्च 2023 ला घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन सौरभ 174 गुण घेऊन सहाय्यक प्राध्यापक पदा करीता पात्र ठरला आहे.

एम.ए,बी एस.सी.(ॲग्री)असलेला सौरभ मागिल वर्षीच तो शारीरिक शिक्षण विभाग सगाबा अमरावती विद्यापीठातुन 98 टक्के गुण घेऊन एम पी एड परीक्षा प्राविण्यासह ऊतीर्ण झाला.बॅडमिंटन व बाॅल बॅडमिंटन या खेळात कलर होल्डर असुन अ.भा.आंतर विद्यापीठ स्पर्धे मध्ये त्यांनी सगाबा अमरावती विद्यापीठ व कृषी विद्यापीठ अकोला चे प्रतिनिधीत्व केले आहे.बॅडमिंटन चे प्रशिक्षक म्हणून NIS(Cirt.)कोर्स सुद्धा केलेला आहे.त्याला अमरावती विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाॅ तनुजा राऊत मॅडम,नेट/सेट स्टडी ,जी.आर एफ गुरुकुल क्लासेस नागपुर चे संचालक डाॅ.करवंदे, डाॅ.अविनाश असनारे व वडील प्रा डाॅ केशव चेटुले,डाॅ.हरीष गजभिये,डाॅ.रविभुषणकदम, डाॅ.रजनी भोयर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांचा या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष श्री अनिरुध्द पाटिल चोंढीकर,उपाध्यक्ष श्री सुभाषराव देशमुख महाविद्यालयाचे चेअरमन श्री शिवाजीराव देशमुख, प्राचार्य हेमंत महल्ले.डाॅ. सौ.अरुणा पवार,गुडमाॅर्नींग सोशल ग्रुप, योगा ग्रुप यांनी सौरभ च्या यशा बद्दल अभिनंदन व कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles